ग्रेट! विक्रमानंतरही विराट कोहलीचे पाय जमिनीवर, सामन्यानंतर मन जिंकणारी कृती, Video 

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi :  भारतीय संघाचे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग आठव्या विजयाची नोंद केली.  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 09:40 PM2023-11-05T21:40:39+5:302023-11-05T21:41:06+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs SA Live Marathi : Virat Kohli acknowledging the Eden gardens ground staff and poses for picture with them after the match, Video  | ग्रेट! विक्रमानंतरही विराट कोहलीचे पाय जमिनीवर, सामन्यानंतर मन जिंकणारी कृती, Video 

ग्रेट! विक्रमानंतरही विराट कोहलीचे पाय जमिनीवर, सामन्यानंतर मन जिंकणारी कृती, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi :  भारतीय संघाचे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग आठव्या विजयाची नोंद केली.  विराट कोहलीने विक्रमी ४९वे शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या वन डेतील सर्वाधिक शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर रविंद्र जडेजाने ५ विकेट्स घेतल्या. भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३२७ धावांच्या उत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २७.१ षटकात ८३ धावांवर तंबूत परतला. 

सचिन माझा हिरो आहे, त्याच्या विक्रमाशी बरोबरी माझ्यासाठी.... ! विराट कोहली म्हणतो..


रोहित शर्माने ( ४० धावा, २४ चेंडू)  दमदार सुरुवात करून दिली. विराट कोहली व श्रेयस अय्यर यांच्या १३४ धावांच्या भागीदारीने संघाला मजबूत स्थितीत आणले.  श्रेयस अय्यर ( ७७), सूर्यकुमार यादव ( २२) व रवींद्र जडेजा ( २९*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ५ बाद ३२६ धावांचा डोंगर उभा केला.  विराटने १२१ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद १०१ धावा केल्या. आफ्रिकेचा संपूर्ण संघ २७.१ षटकांत ८३ धावांवर माघारी पाठवला आणि २४३ धावांनी सामना जिंकला. जडेजाने ९-१-३३-५ अशी स्पेल टाकली. कुलदीप यादव व शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  


४ डिसेंबर २००९ मध्ये विराटने वन डे क्रिकेटमधील पहिले शतकच याच ऐतिहासिक मैदानावर झळकावले होते आणि आज १४ वर्षानंतर त्याने विश्वविक्रमी ४९वे शतक झळकावले. त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. सामन्यानंतर विराटने ईडन गार्डन स्टेडियमच्या ग्राऊंड्समन्सच्या विनंतीचा मान राखला आणि त्यांच्यासोबत फोटो काढला. 

Image

Web Title: ICC ODI World Cup IND vs SA Live Marathi : Virat Kohli acknowledging the Eden gardens ground staff and poses for picture with them after the match, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.