IND vs SL Live : OMG ! रोहित शर्मा वानखेडेवर पुन्हा अपयशी, दुसऱ्या चेंडूवर मधुशंकाने उडवला त्रिफळा, Video 

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळणाऱ्या रोहित शर्माला ( Rohit Sharma) पुन्हा अपयश आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 02:27 PM2023-11-02T14:27:05+5:302023-11-02T14:27:49+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs SL Live : A four and gone! India lose their captain Rohit Sharma on second ball of the innings. Madushanka bowled him, Video  | IND vs SL Live : OMG ! रोहित शर्मा वानखेडेवर पुन्हा अपयशी, दुसऱ्या चेंडूवर मधुशंकाने उडवला त्रिफळा, Video 

India lose their captain Rohit Sharma on second ball of the innings. Madushanka bowled him

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळणाऱ्या रोहित शर्माला ( Rohit Sharma) पुन्हा अपयश आले. वर्ल्ड कपमध्ये  अपराजित भारतीय संघ आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा सामना करायला मैदानावर उतरला. २०११ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीने खणखणीत षटकार खेचून श्रीलंकेला पराभूत करून वर्ल्ड कप उंचावला होता. त्यामुळे रोहितकडून घरच्या प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या आणि त्याने चौकाराने सुरुवातही चांगली केली, पण दिलशान मधुशंकाने टाकलेला दुसरा चेंडू रोहितचा त्रिफळा उडवून गेला. रोहितलाही काहीच समजले नाही अन् स्टेडियम शांत झाले. 

नादच खुळा! २२ हजाराचं तिकीट काढून सांगलीच्या खेराडे विटा इथले शेतकरी वानखेडेला पोहचले


या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  भारतीय संघाने सलग ६ सामने जिंकून १२ गुणांसह उपांत्य फेरीच्या उंबरठ्यापर्यंत झेप घेतली आहे आणि आजचा विजय त्यांच्या अंतिम ४ मधील जागेवर शिक्कामोर्तब करणारा ठरणार आहे. रोहितने पहिला चेंडू चौकार खेचून २०२३ वर्ल्ड कपमध्ये ४०० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीयाचा मान पटकावला. पण, मधुशंकाने दुसराच चेंडू अप्रतिम इनस्वींग टाकला आणि रोहितच्या बॅटीला चकवून तो ऑफ स्टम्प उडवून गेला. रोहितला ४ धावांवर माघारी जावे लागले. वानखेडेवरील वन डे सामन्यांत रोहितला ( १६ वि. आफ्रिका, २०१५; २० वि. न्यूझीलंड, २०१७; १० वि. ऑस्ट्रेलिया २०२०) फार कमाल करता आलेली नाही.  


भारत - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज  


श्रीलंका - पथूम निसंका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशन हेमंथा, महिश थिक्षणा, कसून रजिथा, दुष्मंथा चमिरा, दिलशान मधुशंका  

Web Title: ICC ODI World Cup IND vs SL Live : A four and gone! India lose their captain Rohit Sharma on second ball of the innings. Madushanka bowled him, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.