ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : विराट कोहली ( Virat Kohli), शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या फटकेबाजीने वानखेडे स्टेडियम दणाणून निघाले. विराट व शुबमन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची भागीदारी करून श्रीलंकेला हतबल केले. पण, दोघंही शतकाच्या तोंडावर बाद झाले. विराटला आज वन डेतील ४९वे शतक झळकावून सचिन तेंडुलकच्या विश्वविक्रमाची बरोबरीची संधी होती, परंतु १२ धावांनी ती हुकली. शुबमनचेही शतक ८ धावांनी चुकले. त्यामुळे प्रेक्षक काहीसे निराश झाले, परंतु श्रेयस अय्यरने शतकाचे स्वप्न दाखवले. मात्र, या तिघांना श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाने ( ५-८०) शतकाच्या तोंडावर बाद केले. पण, भारताने त्रिशतक पूर्ण झाले. २०१९च्या वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक १८ वेळा तीनशेपार धावा उभ्या केल्या आहेत.
आधी मिठी अन्...! विराट कोहलीने मैदानावर उतरून मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, Video
कर्णधार रोहित शर्मा ( ४) दुसऱ्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाल्यानंतर विराटच्या ( Virat Kohli) जयघोषाने वानखेडे दणाणून निघाले. विराट-शुबमन यांच्या भागीदारीने श्रीलंकेच्या गोलंदाजांना बॅकफूटवर फेकले. या दोघामध्ये शतक पहिलं कोण झळकावतो याची शर्यत. पण, शुबमन ९२ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर बाद झाला आणि विराटसह त्याची १८९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी शुबमनचे कौतुक केले. मग सर्वांना विराटच्या शतकाची आतुरता होती, परंतु मदुशंकाने त्यालाही शतकापासून वंचित ठेवले. विराट ९४ चेंडूंत ११ चौकारांसह ८८ धावांवर बाद झाला. विराटला दुसऱ्यांदा ४९व्या शतकाने थोडक्यात हुलकावणी दिली.