आधी मिठी अन्...! विराट कोहलीने मैदानावर उतरून मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, Video  

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : कर्णधार रोहित शर्मा त्याच्या घरच्या मैदानावर पुन्हा अपयशी ठरला. पण, विराट कोहलीच्या ( Virat Kohli) जयघोषाने वानखेडे दणाणून सुटले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 03:21 PM2023-11-02T15:21:50+5:302023-11-02T15:22:25+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs SL Live : Virat Kohli has surpassed Sachin Tendulkar's record of most calendar years with 1,000+ ODI runs - 8, Video  | आधी मिठी अन्...! विराट कोहलीने मैदानावर उतरून मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, Video  

आधी मिठी अन्...! विराट कोहलीने मैदानावर उतरून मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : कर्णधार रोहित शर्मा त्याच्या घरच्या मैदानावर पुन्हा अपयशी ठरला. पण, विराट कोहलीच्या ( Virat Kohli) जयघोषाने वानखेडे दणाणून सुटले... सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत विराट नावाचा गजर पाहून सारेच भारावले होते. सामन्याआधी विराट व सचिन यांच्या गळाभेटीचा क्षण दोन दशाकांमधील क्रिकेट चाहत्यांना एकत्रित आणणारा ठरला. सावध सुरूवातीनंतर विराटच्या बॅटीतून धावांचा ओघ सुरू झाला आणि त्याने सचिनचा आणखी एक मोठा विक्रम मोडला. 

विराट कोहली चाचपडला, श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर ३-४ वेळा वाचला अन् विक्रम नोंदवला, Video  


श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  रोहितने पहिला चेंडू चौकार खेचून २०२३ वर्ल्ड कपमध्ये ४०० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीयाचा मान पटकावला. पण, मधुशंकाने दुसऱ्याच चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडवला. दुष्मंथा चमिराच्या अप्रतिम स्पेलवर विराट कोहलीला २-३ जीवदान मिळाले. शुबमन गिलही सावध खेळ करताना दिसला. चाचपडत सुरूवात करणाऱ्या विराटने नंतर शुबमनसोबत चागंला खेळ केला. आशिया खंडात वन डेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये विराटने चौथे स्थान पटकावले. सचिन तेंडुलकर ( १२०६७), सनथ जयसूर्या ( ८४४८) आणि कुमार संगकारा ( ८२४९) हे आघाडीवर आहेत. विराटने आज ८००० धावांचा टप्पा ओलांडला.  


विराट व शुबमन यांनी सेट झाल्यावर धावांची गती वाढवली आणि अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. विराटने २०२३ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पाही आज ओलांडला. कॅरेंडर वर्षात सर्वाधिक ८ वेळा विराटने १०००+ धावा केल्या आणि सचिन तेंडुलकरचा ( १९९४, १९९६-९८, २०००, २००३ व २००७) याचा विक्रम मोडला. विराटने २०११ ते १४, २०१७ ते १९ आणि २०२३ मध्ये असा पराक्रम केला आहे. भारताने १४ षटकांत १ बाद ८५ धावा केल्या आहेत. 

Web Title: ICC ODI World Cup IND vs SL Live : Virat Kohli has surpassed Sachin Tendulkar's record of most calendar years with 1,000+ ODI runs - 8, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.