Join us  

IND vs SL Live : विराट कोहली चाचपडला, श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर ३-४ वेळा वाचला अन् विक्रम नोंदवला, Video  

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात चांगली सुरुवात करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 3:00 PM

Open in App

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात चांगली सुरुवात करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाना करताना विराट कोहली चाचपडताना दिसला. दिलशान मधुशंका आणि दुष्मंथा चमिरा यांनी टिच्चून मारा करून विराटला गांगरून टाकले होते. त्यामुळेच तो सावध झाला अन् डिफेंसिव्ह मोडमध्ये गेला. खेळपट्टीवर टिकल्यानंतर त्याने आणखी एक विक्रम नोंदवला. 

OMG ! रोहित शर्मा वानखेडेवर पुन्हा अपयशी, दुसऱ्या चेंडूवर मधुशंकाने उडवला त्रिफळा, Video 

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  रोहितने पहिला चेंडू चौकार खेचून २०२३ वर्ल्ड कपमध्ये ४०० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीयाचा मान पटकावला. पण, मधुशंकाने दुसराच चेंडू अप्रतिम इनस्वींग टाकला आणि रोहितच्या बॅटीला चकवून तो ऑफ स्टम्प उडवून गेला. रोहितला ४ धावांवर माघारी जावे लागले. वानखेडेवरील वन डे सामन्यांत रोहितला ( १६ वि. आफ्रिका, २०१५; २० वि. न्यूझीलंड, २०१७; १० वि. ऑस्ट्रेलिया २०२०) फार कमाल करता आलेली नाही. २३ वर्षीय मधुशंकाने हा वर्ल्ड कप श्रीलंकेसाठी गाजवला आहे. दुष्मंथा चमिराच्या अप्रतिम स्पेलवर विराट कोहलीला २-३ जीवदान मिळाले. शुबमन गिलही सावध खेळ करताना दिसला. ( पाहा विराटला किती जीवदान मिळाले

चाचपडत सुरूवात झालेल्या विराटने नंतर शुबमनसोबत चागंला खेळ केला. आशिया खंडात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने चौथे स्थान पटकावले. सचिन तेंडुलकर ( १२०६७), सनथ जयसूर्या ( ८४४८) आणि कुमार संगकारा ( ८२४९) हे आघाडीवर आहेत. विराटने आज ८००० धावांचा टप्पा ओलांडला.   

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपविराट कोहलीभारत विरुद्ध श्रीलंका