नेदरलँड्सचा करिष्मा! ९१ धावांत पडलेल्या ६ विकेट्स, तरीही श्रीलंकेसमोर उभं केलं तगडं आव्हान

ICC ODI World Cup NED vs SL Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सुसाट पळणारा दक्षिण आफ्रिकेचा अश्व नेदरलँड्सने रोखला अन् स्पर्धेतील आश्चर्यकारक निकाल नोंदवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 02:39 PM2023-10-21T14:39:35+5:302023-10-21T14:40:37+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup NED vs SL Live : 91/6 to 262/10, One of the greatest fightback given by the Netherlands, Sybrand Engelbrecht - 70(82) & Logan Van Beek - 59(75)  | नेदरलँड्सचा करिष्मा! ९१ धावांत पडलेल्या ६ विकेट्स, तरीही श्रीलंकेसमोर उभं केलं तगडं आव्हान

नेदरलँड्सचा करिष्मा! ९१ धावांत पडलेल्या ६ विकेट्स, तरीही श्रीलंकेसमोर उभं केलं तगडं आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup NED vs SL Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सुसाट पळणारा दक्षिण आफ्रिकेचा अश्व नेदरलँड्सने रोखला अन् स्पर्धेतील आश्चर्यकारक निकाल नोंदवला होता. आज पुन्हा एकदा नेदरलँड्सने कमाल करून दाखवताना श्रीलंकेसमोर तगडे आव्हान उभे केले. नेदरलँड्सचे ६ फलंदाज अवघ्या ९१ धावांत तंबूत परतले होते, परंतु त्यानंतर सिब्रँड इंग्लेब्रेच व लोगन व्हॅन बीक यांनी दमदार फटकेबाजी केली. 


नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु श्रीलंकेच्या कसून रंजिथाने डचची आघाडीची फळी नेस्तानाबूत केली. विक्रमजीत सिंग ( ४), मॅक्स ओडोव ( १६) व कॉलिन एकरमन ( २९) यांच्या विकेट्स रंजिथाने घेतल्या. त्यानंतर दिलशान मधुशंकाने दोन धक्के देताना बॅस डी लीड ( ६) व तेजा निदामनुरू ( ९) यांना मागे पाठवले. महीष थिक्षणाने कर्णधार स्कॉट एडवर्डची ( १६) विकेट घेऊन नेदरलँड्सची अवस्था ६ बाद ९१ अशी केली.


त्यानंतर इंग्लेब्रेच व व्हॅन बीक या जोडीने सातव्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली आणि जबरदस्त कमबॅक करून दिले. इंग्लेब्रेचने ८२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकाराच्या सहाय्याने ७० धावा केल्या. व्हॅन बीकने ७५ चेंडूंत ५९ धावांची खेळी केली. नेदरलँड्सने ६ बाद ९१ वरून सर्वबाद २६२ धावांपर्यंत मजल मारली. मधुशंका आणि रंजिथा यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. २००७नंतर वर्ल्ड कप सामन्यात श्रीलंकेच्या दोन गोलंदाजांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. २००७च्या वर्ल्ड कप स्पर्धेत मुथय्या मुरलीधरन ( ४-१९) व फरवीज महरूफ ( ४-२५) यांनी आयर्लंडविरुद्ध असा पराक्रम केला होता.  

Web Title: ICC ODI World Cup NED vs SL Live : 91/6 to 262/10, One of the greatest fightback given by the Netherlands, Sybrand Engelbrecht - 70(82) & Logan Van Beek - 59(75) 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.