ICC ODI World Cup NZ vs AFG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा २०२३ मधील सर्वोत्तम झेल आज पाहायला मिळाला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आज अफगाणिस्तानकडून ५ झेल टाकले गेले, तेच दुसरीकडे किवी खेळाडूंनी मिळालेली प्रत्येक संधी दोन्ही हातांनी कवेत घेतली. मिचेल सँटनरने ( MITCHELL SANTNER) आज घेतलेला झेल हा स्पर्धेतील सर्वोत्तम ठरल्यास आश्चर्य वाटायला नको.
भारत, न्यूझीलंड यांची गाडी सुसाट; 'डच'च्या धक्क्यामुळे उर्वरित दोन जागांसाठी शर्यत जबराट
गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत धक्कादायक विजयाची नोंद करणाऱ्या अफगाणिस्तानचा खेळ आज फसला. अफगाणिस्ताच्या खेळाडूंनी ५ सोपे झेल टाकले. ग्लेन फिलिप्स ( ७१) व टॉम लॅथम ( ६८) यांनी जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलताना वैयक्तिक अर्धशतकासह १४४ धावांची भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या किवी फलंदाजांमध्ये ग्ले फिलिप्सने चौथे स्थान पटकावले. फिलिप्स ८० चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ७१ धावांवर बाद झाला आणि लॅथमसह त्याची १४४ धावांची ( १५२ चेंडू) भागीदारी संपुष्टात आली. नवीनने त्याच षटकात लॅथमचा त्रिफळा उडवला. लॅथमने ७४ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ६८ धावा केल्या. न्यूझीलंडने ६ बाद २८८ धावा केल्या. मार्क चॅम्पमनने १२ चेंडूंत नाबाद २५ धावा केल्या.
वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडकडून सर्वाधिक ३ वेळा ५०+ धावा करण्याच्या ब्रेंडन मॅक्युलमच्या विक्रमाशी आज टॉम लॅथमने बरोबरी केली. लॅथम व फिलिप्स यांची १४४ धावांची भागीदारी ही न्यूझीलंडकडून वर्ल्ड कप स्पर्धेतील ५व्या विकेटसाठीची दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. ख्रिस क्रेन्स व आर टवोस यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९९९ मध्ये १४८ धावा जोडल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानला सावध खेळ करूनही काही खास छाप पाडता आली नाही. २७ धावांवर त्यांचा पहिला फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज ( ११) मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पुढच्याच षटकात ट्रेंट बोल्टने इब्राहिम झाद्रानला ( १४) सँटनरकरवी झेलबाद केले. १४व्या षटकात ल्युकी फर्ग्युसनने टाकलेल्या बाऊन्सरवर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी फसला अन् चेंडू हवेत उडाला. स्क्वेअर लेगच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूसाठी सँटनरने हवेत डाईव्ह मारली अन् एका हाताने अविश्वसनीय झेल टिपला.