NZ vs AFG Live : ५ झेल सोडले, अफगाणिस्तानने स्वतःचे ग्रह फिरवून घेतले; न्यूझीलंडने ठोकून काढले

ICC ODI World Cup NZ vs AFG Live : गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत धक्कादायक विजयाची नोंद करणाऱ्या अफगाणिस्तानचा खेळ आज फसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 05:46 PM2023-10-18T17:46:34+5:302023-10-18T17:55:08+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup NZ vs AFG Live : GLENN PHILLIPS ( 71) & Tom Latham ( 68) 144 runs partnership, Afghanistan fielder drop 5 easy catches, New Zealand- 288/6 ( 50 overs) | NZ vs AFG Live : ५ झेल सोडले, अफगाणिस्तानने स्वतःचे ग्रह फिरवून घेतले; न्यूझीलंडने ठोकून काढले

NZ vs AFG Live : ५ झेल सोडले, अफगाणिस्तानने स्वतःचे ग्रह फिरवून घेतले; न्यूझीलंडने ठोकून काढले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup NZ vs AFG Live : गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत धक्कादायक विजयाची नोंद करणाऱ्या अफगाणिस्तानचा खेळ आज फसला. गत उपविजेत्या न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी मधल्या षटकांत १ धावेत ३ फलंदाज माघारी पाठवून पकड घेतली होती. पण, त्यानंतर अतिउत्साहात अफगाणिस्ताच्या खेळाडूंनी ५ सोपे झेल टाकले आणि तेच महागात पडले. ग्लेन फिलिप्स व टॉम लॅथम यांनी जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलताना वैयक्तिक अर्धशतकासह १४४ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने धावांचा डोंगर उभा केला.

 


न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हॉन कॉनवे २० धावांवर मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर विल यंग व राचिन रविंद्र यांनी ७९ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडची गाडी रुळावर आणली होती. पण, १ धावांत त्यांनी ३ विकेट्स गमावल्या. अझमतुल्लाह ओमारझाईने न्यूझीलंडला दुसरा धक्का देताना राचिनचा ( ३२) त्रिफळा उडवला. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने सलामीवीर यंगला बाद केले. यंगने ६४ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. पुढच्याच षटकात राशीद खानने किवींचा चौथा फलंदाज डॅरील मिचेलचा ( १) अडथळा दूर केला.

Image 
अफगाणिस्तानला सामन्यावरील पकड अधिक मजबूत करण्याची संधी होती, परंतु त्यांच्याकडून काही झेल सुटले अन् स्टम्पिंगची संधीही गमावली. त्यामुळे राशीद खान थोडा संतापलेलाही दिसला. ग्लेन फिलिप्स आणि टॉम लॅथम यांना खेळपट्टीवर जम बसवण्याची त्यांनी संधी दिली. या दोघांची सेट झालेली जोडी तोडण्याची संधी राशीदने निर्माण केली होती, परंतु लॅथमचा हलवा झेल मुजीबने टाकला. पुढच्याच षटकात राशीदच्याच गोलंदाजीवर फिलिप्सचा झेल टाकला. अफगाणिस्तानने ४ सोपे झेल सोडले अन् तेच त्यांना महागात पडले. फिलिप्सने अर्धशतकासह लॅथमसह पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली.

Image
वर्ल्ड कप स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या किवी फलंदाजांमध्ये ग्ले फिलिप्सने चौथे स्थान पटकावले. जेम्स निशॅम नाबाद ९७ ( वि. पाकिस्तान, २०१९), मार्टीन क्रोव ९७ ( वि. इंग्लंड, १९८३) आणि कोरी अँडरसन ७५ ( वि. श्रीलंका, २०१५) हे आघाडीवर आहेत. नवीन उल हकच्या फुलटॉसवर फिलिप्सने उत्तुंग फटका मारला अन् यावेळेस राशीदने तो टिपला. फिलिप्स ८० चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ७१ धावांवर बाद झाला आणि लॅथमसह त्याची १४४ धावांची ( १५२ चेंडू) भागीदारी संपुष्टात आली. नवीनने त्याच षटकात लॅथमचा त्रिफळा उडवला. लॅथमने ७४ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ६८ धावा केल्या.  न्यूझीलंडने ६ बाद २८८ धावा केल्या.  मार्क चॅम्पमनने १२ चेंडूंत नाबाद २५ धावा केल्या.

Web Title: ICC ODI World Cup NZ vs AFG Live : GLENN PHILLIPS ( 71) & Tom Latham ( 68) 144 runs partnership, Afghanistan fielder drop 5 easy catches, New Zealand- 288/6 ( 50 overs)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.