ICC ODI World Cup NZ vs AFG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स ( डच ) यांनी धक्कादायक निकालाची नोंद करताना अनुक्रमे गतविजेता इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांना पराभूत केले. अफगाणिस्तानने अनपेक्षित धक्का देताना स्पर्धेतील चुरस वाढवली. गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आज अफगाणिस्तान मैदानावर उतरला. त्यांनी आजही किवींचे ३ फलंदाज १ धावेत माघारी पाठवून अचंबित कामगिरी केली. त्यामुळे आजही ते धक्का देतात का अशी चर्चा सुरू झालीय.
भारत, न्यूझीलंड यांची गाडी सुसाट; 'डच'च्या धक्क्यामुळे उर्वरित दोन जागांसाठी शर्यत जबराट
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत विल यंगला आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग यांना किवींनी चांगली सुरूवात करून देता आली नाही. कॉनवे २० धावांवर मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर विल यंग व राचिन रविंद्र यांनी ७९ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडची गाडी रुळावर आणली होती.
पण, १ धावांत त्यांनी ३ विकेट्स गमावल्या. अझमतुल्लाह ओमारझाईने न्यूझीलंडला दुसरा धक्का देताना राचिनचा ( ३२) त्रिफळा उडवला. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने सलामीवीर यंगला बाद केले. यंगने ६४ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. पुढच्याच षटकात राशीद खानने किवींचा चौथा फलंदाज डॅरील मिचेलचा ( १) अडथळा दूर केला.