ICC ODI World Cup NZ vs SL Live : न्यूझीलंडनेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याची दिसतेय. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत प्रथम गोलंदाजी करताना किवींनी ५ धक्के दिले. ट्रेंट बोल्टने ( Trent Boult ) ३ विकेट्स घेऊन श्रीलंकेचे कंबरडे मोडले होते, परंतु कुसल परेराने ( Kusal Parera ) एकट्याने फटकेबाजी केली. त्याने या वर्ल्ड कपमधील वेगवान फिफ्टी झळकावली.
पाकिस्तानमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, सुरू झालाय तळ्यात-मळ्यातला खेळ!
एक संघ वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीचे स्थानासाठी आणि दुसरा संघ चॅम्पियन्स ट्ऱ़ॉफी २०२५च्या पात्रतेसाठी आज समोरासमोर आले आहेत. न्यूझीलंडला ही मॅच जिंकून उपांत्य फेरीचे स्थान पक्के करता येणार आहे आणि आज त्यांनी नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. टीम साऊदीने दुसऱ्याच षटकांत पथूम निसंका ( २) याला बाद केले. त्यानंतर ट्रेंट बोल्टने एकाच षटकात कर्णधार कुसल मेंडिस ( ६) व सदीरा समराविक्रमा ( १) यांना माघारी पाठवले. पण, दुसऱ्याच षटकात जीवदान मिळालेल्या कुसल परेराने किवींची धुलाई केली. साऊदीने टाकलेल्या ६व्या षटकात परेराने १८ धावा कुटल्या. आक्रमक फटकेबाजी करून त्याने २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वात वेगवान फिफ्टी ठरली. कुसल मेंडिसने २५ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.
बोल्टने दुसऱ्या बाजूने श्रीलंकेला धक्का देण्याचे सत्र सुरू ठेवले आणि चरिथ असलंकाला ( ८) पायचीत करून परेरासह त्याची ३८ धावांची भागीदारी तोडली. ल्युकी फर्ग्युसनने त्याच्या पहिल्याच षटकात न्यूझीलंडला मोठी विक्ट मिळवून दिली. त्याने २८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा करणाऱ्या परेराला माघारी पाठवले. श्रीलंकेचा निम्मा संघ ९.३ षटकांत ७० धावांवर माघारी परतला.