ICC ODI World Cup NZ vs SL Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठगाल करताना न्यूझीलंडला रचिन रवींद्र व डेव्हॉन कॉनवे यांनी आक्रमक सुरूवात केली. न्यूझीलंडच्या ताफ्यातील युवा फलंदाज रचिनने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि मोठमोठे विक्रम मोडले. आज तर त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर १९९६ पासून असलेला विक्रम मोडला.
न्यूझीलंडचा दमदार खेळ, पाकिस्तानचा गणिताशी जमेना 'मेळ'; डोकं आपटायची आलीय वेळ
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी जशी सुरुवात केली होती ते पाहता श्रीलंकेचा डाव २५ षटकांच्या आत गडगडेल असे वाटले होते. पण, महीशा तीक्षणा आणि दिलशान मधुसंका यांनी दहाव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करून श्रीलंकेला सन्मानजकन धावसंख्या उभारून दिल्या. टीम साऊदीने दुसऱ्या षटकात विकेटचा श्रीगणेशा केला. त्यानंतर ट्रेंट बोल्टने ३ विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडकडून वर्ल्ड कपमध्ये ५० विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. कुसल परेराने या वर्ल्ड कमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने २८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा चोपल्या.
रचिनने पहिली धाव घेताच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. वयाच्या पंचवीशीच्या आत वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक धावांचा विक्रम रचिनने आज नावावर केला. सचिनने १९९६मध्ये ५२३ धावा करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली होती. बाबर आजम २०१९मध्ये ४७४ धावा करून जवळ पोहोचला होता. २००७मध्ये एबी डिव्हिलियर्सनेही ३७२ धावा केल्या होत्या. वर्ल्ड कप पदार्पणात सर्वाधिक धावांचा विक्रमही आज रचिनने नावावर केला. त्याने जॉनी बेअरस्टोचा २०१९ सालचा ५३२ धावांचा विक्रम मोडला.