Join us  

मोहम्मद नबीने पाकिस्तानी कर्णधाराला दिली वॉर्निंग; त्यानंतर बाबर आजमने पाहा काय केलं, Video  

सलग दोन पराभवानंतर कर्णधार बाबर आजमने ( Babar Azam) जबाबदारीने खेळ करून संघाला चांगल्या धावसंख्येच्या दिशेने नेले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 4:52 PM

Open in App

ICC ODI World Cup PAK vs AFG Live : पाकिस्तानी संघ आज मजबूत स्थितीत दिसतोय... सलग दोन पराभवानंतर कर्णधार बाबर आजमने ( Babar Azam) जबाबदारीने खेळ करून संघाला चांगल्या धावसंख्येच्या दिशेने नेले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद नबी (Mohammad Nabi ) आणि बाबर यांच्यातले दोन व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. 

PAK vs AFG Live : १८ वर्षांच्या नूर अहमदसमोर पाकिस्तानी ढेपाळले; गोलंदाजाने मोडला सचिनचा ३१ वर्षांपूर्वीचा विक्रम

पाकिस्तानचा संघ आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. इमाम-उल-हक ( १७) आणि अब्दुल्लाह शफिक यांनी पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. अब्दुल्लाह व कर्णधार बाबर आजम यांनी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला होता. १८ वर्षीय गोलंदाज नूर अहमदने त्यानंतर अब्दुल्लाह ( ५८ ) आणि मोहम्मद रिझवान ( ८) यांना माघारी पाठवले. वर्ल्ड कप स्पर्धेत विकेट घेणारा नूर अहमद हा चौथा युवा गोलंदाज ठरला.  तो १८ वर्ष व २९३  दिवसांचा आहे आणि त्याने आज विकेट घेऊन सचिन तेंडुलकरचा ( १८ वर् ३१५ दिवस) १९९२ च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील विक्रम मोडला.  

बाबर आणि सौद शकील यांनी पाकिस्तानच्या डावाला पुन्हा उभारी देण्यास सुरूवातच दिली होती, की मोहम्मद नबीने त्यांना धक्का दिला. सौद ३४ चेंडूंत २५ धावांवर राशीद खानच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पण, बाबर खंबीरपणे उभा राहिला आणि त्याने अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, बाबरला अफगाणिस्तानचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद नबीकडून चेंडू टाकण्यापूर्वी क्रिज न सोडण्याची वॉर्निंग मिळाली... नबी चेंडू टाकण्याआधीच बाबरने क्रिज सोडली होती आणि नबीने त्याला रन आऊट करण्याएवजी वॉर्निंग देऊन सोडले.  त्यानंतर बाबरनेही एका कृतीने मनं जिंकली. बाबरच्या बुटांची लेस सुटली होती आणि नबी ती बांधण्यासाठी पुढे आला. पण, बाबरने त्याच्या वयाचा व अनुभवाचा मान राखून त्याला तसं न करण्यास सांगितले. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपऑफ द फिल्डपाकिस्तानअफगाणिस्तानबाबर आजम