ICC ODI World Cup PAK vs AFG Live : ४ सामन्यांत २ विजय व २ पराभवामुळे पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी आता प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचा आहे. सलग २ हार पत्करल्यानंतर पाकिस्तानचा संघ आज अफगाणिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. इमाम-उल-हक आणि अब्दुल्लाह शफिक यांनी पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी करून अफगाणिस्ताच्या गोलंदाजांचा सामना केला. इमाम ( १७) ११व्या षटकात अझमतुल्लाह ओमारझाईच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अब्दुल्लाह व कर्णधार बाबर आजम यांनीही अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला होता. पण, नूर अहमदने २३व्या षटकात अब्दुल्लाहला ( ५८ ) पायचीत केले.
ब्रेकिंग : भारताचे महान खेळाडू बिशन सिंग बेदी यांचे ७७व्या वर्षी निधन
वर्ल्ड कपमध्ये तुफान फॉर्मात असलेला मोहम्मद रिझवान आज अफगाणच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरला. त्याला ८ धावांवर नूर अहमदने झेलबाद केले. वर्ल्ड कप स्पर्धेत विकेट घेणारा नूर अहमद हा चौथा युवा गोलंदाज ठरला. तो १८ वर्ष व २९३ दिवसांचा आहे आणि त्याने आज विकेट घेऊन सचिन तेंडुलकरचा १९९२ च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील विक्रम मोडला. सचिनने १८ वर् ३१५ दिवसांचा असताना पाकिस्तानविरुद्ध विकेट घेतली होती. या विक्रमात जावेद मियाँदाद ( १७ वर्ष व ३६४ दिवस वि. वेस्ट इंडिज, १९७५), मुजीब उर रहमान ( १८ वर्ष व ६५ दिवस वि. ऑस्ट्रेलिया, २०१९) आणि जॉर्ज डॉक्रेल ( १८ वर्ष व २१८ दिवस वि. बांगलादेश, २०११) हे आघाडीवर आहेत.
पाकिस्तान संघ - बाबर आजम (कर्णधार), अब्दुलाह शफिक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हारिस रौफ.
अफगाणिस्तान संघ - हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमनुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, रहमत शाह, इक्रम अलिखिल, मोहम्मद नबी, अझमतुल्लाह ओमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, नूर अहमद.