Join us  

Video : अफगाणिस्तानच्या ओपनर्सनी पाकिस्तानला बदडलं, वैतागलेल्या प्रशिक्षकांनी डग आऊट सोडलं

ICC ODI World Cup PAK vs AFG Live : पाकिस्तान संघाच्या खेळात काही सुधारणा झाल्याचे दिसत नाहीए

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 7:14 PM

Open in App

ICC ODI World Cup PAK vs AFG Live : पाकिस्तान संघाच्या खेळात काही सुधारणा झाल्याचे दिसत नाहीए. त्यांची फिल्डींग पाहून मुख्य प्रशिक्षक ऑर्थर यांनीही डोक्यावर हात मारल्याचे आज पाहायला मिळाले. त्यात अफगाणिस्तानकडून मिळालेल्या अनपेक्षित प्रतिउत्तरातून बाबर आजम अँड टीम गांगरली. हॅरीस रौफचे ( Haris Rauf) तर अफगाणिस्तानचा सलामीवीर हरमनुल्लाह गुरबाज ( Rahmanullah Gurbaz) याने दणक्यात स्वागत केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या षटकात २४ धावा देणाऱ्या रौफने आज अफगाणिस्तानला १७ धावा दिल्या.  

पाकिस्तानच्या संघाला आज सूर गवसला. इमाम-उल-हक ( १७) आणि अब्दुल्लाह शफिक ( ५८) यांच्या चांगल्या सुरुवातीनंतरही पाकिस्तानच्या मधल्या फळीने आज निराश केले होते. पण, सौद शकिल ( २५) व बाबर आजम यांनी गाडी रुळावर आणली. बाबरला शादाब खानने चांगली साथ दिली. बाबर ९२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारांच्या मदतीने ७४ धावांवर झेलबाद झाला. ४२व्या षटकात बाबर बाद झाला तेव्हा पाकिस्तानच्या २०६ धावा होत्या आणि त्यानंतर इफ्तिखार व शादाब यांनी चांगली फटकेबाजी केली. या दोघांनी ४५ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली आणि इफ्तिखार २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांच्या आतषबाजीसह ४० धावांवर झेलबाद झाला. शादाबने ३७ चेंडूंत ४० धावा केल्या आणि पाकिस्तानला ७ बाद २८२ धावांवर समाधान मानावे लागले. 

 प्रत्युत्तरात, अफगाणिस्तानच्या ओपनर्सनी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी बेक्कार चोप दिला. गुरबाज व इब्राहिम झाद्रान यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करून १३ षटकांत फलकावर ८१ धावा चढवल्या. हॅरिस रौफच्या पहिल्याच षटकात गुरबाजने १७ धावा चोपल्या. पाकिस्तानची अवस्था पाहून प्रशिक्षक मिकी आर्थर वैतागले आणि त्यांनी डग आऊटमधून ड्रेसिंग रुममध्ये जाणे योग्य समजले.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानअफगाणिस्तान