ICC ODI World Cup PAK vs AUS Live : ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. बंगळुरु येथील स्टेडियमवर आज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची पाकिस्तानची केलेली अवस्था पाहून भारतीय संघावरील २० वर्षांपूर्वीचं ओझं हलकं केलं.
४,६,१,wd,४,४,४! डेव्हिड वॉर्नरचा Vintage शॉट, हॅरिस रौफच्या ६ चेंडूंत कुटल्या २४ धावा, Video
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा बाबर आजमचा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट आला आहे. संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज हॅरिस रौफलाही ऑसींनी नाही सोडले. वॉर्नरने गुडघ्यावर बसून रौफला मारलेला सिक्स स्टेडियमच्या छतावर आदळला. त्याच्या पहिल्या षटकात २४ धावा कुटल्या. ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वॉर्नरने ( १०९०*) दुसरे स्थान पटकावले. वॉर्नरने आज अॅडम गिलख्रिस्टचा ( १०८५) विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पहिल्या १० षटकांत ८२ धावा कुटल्या आणि या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या १० षटकांत दिलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. २००३ नंतर पाकिस्तानची झालेली ही बेक्कार धुलाई आहे. २००३मध्ये त्यांनी भारताविरुद्ध जोहान्सबर्ग येथे ८० धावा कुटल्या होत्या.
वॉर्नरने ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं आणि मार्शनेही ४० चेंडूंत फिफ्टी पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत १४९ धावांचा पल्ला उभा केला. ११ ते २० षटकांत पाकिस्तानी गोलंदाजांनी धावांवर थोडं अंकुश मिळवला आणि यादरम्यान ६७ धावा दिल्या.