ICC ODI World Cup PAK vs AUS Live : अपेक्षाचं ओझं घेऊन भारतात वन डे वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलेला बाबर आजम ( Babar Azam) आतापर्यंत काही खास करू शकलेला नाही. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून दिल्यानंतर बाबरला धावांची गती कायम राखायची होती, परंतु तो त्यातही अपयशी ठरला. पॅट कमिन्सने अफलातून झेल घेताना त्याला माघारी पाठवला.
''मी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार'', पोलीस व चाहत्यामध्ये Live मॅचमध्ये वाद, Video
इमाम-उल-हक आणि अब्दुल्लाह शफिक यांनी मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेतला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३४ धावा जोडल्या. मार्कस स्टॉयनिसने २२व्या षटकात ही भागीदारी तोडली. शफिक ६१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६४ धावांवर झेलबाद झाला. इमामलाही २४व्या षटकात स्टॉयनिसने चूक करण्यास भाग पाडले. तो ७१ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ७० धावांवर झेलबाद झाला. शफिक व इमाम यांची १३४ धावांची भागीदारी ही पाकिस्तानी ओपनर्सकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी सर्वोत्तम ठरली. मोहसिन खान व मुदस्सर नजर यांनी १९८५ मध्ये १४१ धावा जोडल्या होत्या. शफिक व इमाम यांनी आज मोहम्मद हाफिज व नसीर जमशेद ( १२९) यांचा २०१२ सालचा विक्रम मोडला. वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानकडून ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली.
अॅडम झम्पाने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. झम्पाच्या चेंडूवर बाबरने पुल शॉट मारला परंतु मिड विकेटला पॅट कमिन्सने अफलातून झेल घेतला. बाबर १४ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने १८ धावांवर माघारी परतला. वर्ल्ड कप स्पर्धेत चार सामन्यांत त्याला ५ ( वि. नेदरलँड्स), १० ( वि श्रीलंका), ५० ( वि. भारत) अशी कामगिरी करता आलेली आहे.
Web Title: ICC ODI World Cup PAK vs AUS Live : Babar Azam dismissed for 18 from 14 balls, Pat Cummins taken this ripper of a catch, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.