ICC ODI World Cup PAK vs AUS Live : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न सर्वांना पडला असेल. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी आज दमदार फटकेबाजी केली. दोघांनी पहिल्या १० षटकांत ८२ धावा चोपून नवा विक्रम नोंदवला. पाकिस्तानचे गोलंदाज रडकुंडीला आले होते. वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध सलग चौथे शतक झळकावताना विराट कोहलीच्या ( वि. वेस्ट इंडिज) विक्रमाशी बरोबरी केली. पाठोपाठ मार्शनेही शतक झळकावले आणि या जोडीने १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
टीम इंडियाचं २० वर्षांपूर्वीचं 'ओझं' हलकं झालं! ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला असं बेक्कार ठोकलं
हसन अलीची धुलाई केल्यानंतर वॉर्नरने अनुभवी गोलंदाज हॅरिस रौफच्या एका षटकात २४ धावा कुटल्या. ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वॉर्नर ( १०९०*) दुसऱ्या स्थानावर आला. ऑसींनी पहिल्या १० षटकांत ८२ धावा कुटल्या आणि या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या १० षटकांत दिलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. वॉर्नरने ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं आणि मार्शनेही ४० चेंडूंत फिफ्टी पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत १४९ धावांचा पल्ला उभा केला. ११ ते २० षटकांत पाकिस्तानी गोलंदाजांनी धावांवर थोडं अंकुश मिळवला आणि यादरम्यान ६७ धावा दिल्या.
पण, ही सेट झालेली जोडी काही केल्या पाकिस्तानी गोलंदाजांना तोडता येत नव्हती. बाबरने सहा गोलंदाज वापरले, तरीही उपयोग नाही झाला. वॉर्नरने ८५ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. पाकिस्तानविरुद्ध वॉर्नरचे हे सलग चौथे शतक ठरले. पाठोपाठ मार्शनेही १०० चेंडूंत १० चौकार व ६ षटकारांच्या मदतीने शतक झळकावले. या जोडीने पहिल्या विकेटसाठी वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावांची भागीदारी केली. २०११ मध्ये ब्रॅड हॅडीन व शेन वॉटसन यांनी कॅनडाविरुद्ध १८३ धावांची सलामी दिली होती.
Web Title: ICC ODI World Cup PAK vs AUS Live : David Warner & Mitch Marsh registered Australia's highest opening Men's World Cup partnership, both score century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.