"मी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार", पोलीस व चाहत्यामध्ये Live मॅचमध्ये वाद, Video  

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरूच्या मैदानावर सामना सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 08:36 PM2023-10-20T20:36:17+5:302023-10-20T20:36:37+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup PAK vs AUS Live : Fan are being stopped from cheering "Pakistan Zindabad" at the banglore stadium  | "मी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार", पोलीस व चाहत्यामध्ये Live मॅचमध्ये वाद, Video  

"मी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार", पोलीस व चाहत्यामध्ये Live मॅचमध्ये वाद, Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरूच्या मैदानावर सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या ३६७ धावांना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी १३४ धावांची भागीदारी करून चोख प्रत्युत्तर दिले. पण, या सामन्यात पाकिस्तानचा चाहता आणि बंगळुरू पोलिसांमध्ये मोठा वाद झालेला पाहायला मिळाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी चाहते पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असताना पोलिसांशी वाद झाला.


पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियासमोर मैदानात चांगली फलंदाजी करत होता, तेव्हा एक पाकिस्तानी चाहता स्टँडमध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होता. यावर बंगळुरू पोलीस कर्मचारी चाहत्याजवळ आले आणि त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ने देण्यास सांगितले. यावर चाहता म्हणाला, मी पाकिस्तानातून आलो आहे आणि पाकिस्तान झिंदाबादचे नारे लावू शकत नाही का? मी पाकिस्तानी आहे आणि ऑस्ट्रेलियासमोर माझ्या संघाला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देईन. 



मिचेल मार्श (१२१ धावा) आणि डेव्हिड वॉर्नर (१६३ धावा) या सलामीवीरांच्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध ५० षटकात ९ विकेट गमावून ३६७ धावांची मोठी धावसंख्या उभारली.  पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने ५ बळी घेतले, तर हॅरिस रौफने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात पाकिस्तानने २७ षटकांत ३ बाद १७७ धावा केल्या आहेत. 
 

Web Title: ICC ODI World Cup PAK vs AUS Live : Fan are being stopped from cheering "Pakistan Zindabad" at the banglore stadium 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.