ICC ODI World Cup PAK vs AUS Live । बंगळुरू : वन डे विश्वचषकात आज बंगळुरू येथे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. यजमान भारताकडून झालेल्या दारूण पराभवानंतर नव्या उमेदीने पाकिस्तानी संघ मैदानात उतरला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना शेजाऱ्यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. भारताविरूद्धच्या सामन्यानंतर शादाब खानला पाकिस्तानी संघात स्थान मिळाले नाही. आमच्या फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे यावेशी बाबरने नमूद केले. शादाबच्या जागी उसामा मीरला शेजाऱ्यांच्या संघात स्थान मिळाले. नेहमीप्रमाणे पाकिस्तानने आज देखील खराब क्षेत्ररक्षण केले, ज्यावरून सोशल मीडियावर शेजाऱ्यांना ट्रोल केले जात आहे.
पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई सुरू असताना शाहीन आफ्रिदीने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का देण्याचा प्रयत्न केला. पण, पुन्हा एकदा पाकिस्तानने क्षेत्ररक्षणात चूक केली अन् सोपा झेल सोडला. खराब क्षेत्ररक्षणानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. वॉर्नरने बाहेरच्या चेंडूवर मारलेला फटका हवेत उडाला. पदार्पणाचा सामना खेळत असलेला उसामा मीर याच्यासाठी सोपा झेल होता. पण, मिड ऑनला उभ्या असलेल्या मीरने तो टाकला अन् पाकिस्तानच्या खेळाडूंनी डोक्यावर हात मारून घेतला.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ -
बाबर आझम (कर्णधार), इमाम-उल-हक, अब्दुला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल मार्श, डेव्हिन वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
नव्या उमेदीने पाकिस्तानी संघ मैदानात
पाकिस्तानी संघाला आपल्या तिसऱ्या सामन्यात यजमान भारतीय संघाकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या होत्या. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने अर्धशतकी खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
Web Title: ICC ODI World Cup PAK vs AUS Live Funny memes are going viral on social media after Pakistan fielder Usama Mir dropped an easy catch to David Warner off the bowling of Shaheen Afridi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.