Join us  

जावई शाहीनची सासरेबुवा शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी, तरीही पाकिस्तानची नकोशी कामगिरी 

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : डेव्हिड वॉर्नर ( १६३) आणि मिचेल मार्श ( १२१) यांच्या विक्रमी फटकेबाजीने पाकिस्तानच्या गोलंदाजांना हतबल केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 7:39 PM

Open in App

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : डेव्हिड वॉर्नर ( १६३) आणि मिचेल मार्श ( १२१) यांच्या विक्रमी फटकेबाजीने पाकिस्तानच्या गोलंदाजांना हतबल केले होते. ही दोघं असेपर्यंत ऑस्ट्रेलिया ४०० पार जाते असे वाटत होते. पण, पाकिस्तानी गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. शाहीन आफ्रिदीने १०-१-५४-५ अशी अप्रतिम स्पेल टाकली.  ३२५ धावांवर ऑस्ट्रेलियाची ही चौथी विकेट पडली अन् त्यानंतर त्यांना पुढील ८ षटकांत ४२ धावा करता आल्या. पाकिस्तानने ६ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाला ९ बाद ३६७ धावाच करता आल्या. ५ विकेट्स घेऊन शाहीनने सासरेबुवा शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी केली.

 

  • पाकिस्तानकडून पदार्पणात सर्वाधिक धावांचा नकोसा विक्रम आज उसामा मीरच्या नावावर नोंदवला गेला. त्याने ९ षटकांत ८२ धावा दिल्या आणि १ विकेट घेतली. याआधी २०१९मध्ये शाहीनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० षटकांत २ बाद ७० अशी कामगिरी केली होती.
  • वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची ९ बाद ३६७ ही पाचवी सर्वोत्तम खेळी ठरली. त्यांनी २०१५ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ६ बाद ४१७ धावा केल्या होत्या आणि ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे.  २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध ५ बाद ३८१ धावा, २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६ बाद ३७७ धावा आणि २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ९ बाद ३७९ धावा केल्या होत्या. 
  • वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध चोपल्या गेलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. याच वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने त्यांच्याविरुद्ध ९ बाद ३४४ धावांचा विक्रम केला होता.  
  • ऑस्ट्रेलियाच्या संघाने आज १९ षटकार खेचले आणि वन डे क्रिकेटमधील ही त्यांची सर्वाधिक षटकारांची खेळी ठरला. यापूर्वी २०१९मध्ये भारताविरुद्ध बंगळुरू येथेच त्यांनी १९ षटकार खेचले होते.  
  •  वर्ल्ड कप स्पर्धेत शाहीनने दुसऱ्यांदा सामन्यात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आणि पाकिस्तानकडून शाहिद आफ्रिदीनंतर ( २) असा पराक्रम करणारा तो दुसरा गोलंदाज बनला आहे.  

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानआॅस्ट्रेलियाशाहिद अफ्रिदी