PAK vs BAN Live : शाहीन आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड; भारताच्या जसप्रीत बुमराहलाही हे जमलं नाही, Video

ICC ODI World Cup PAK vs BAN Live : वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान वाचवण्यासाठी धडपडणारे दोन संघ पाकिस्तान-बांगलादेश आज कोलकाताच्या ईडन गार्डनवर भिडत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 02:38 PM2023-10-31T14:38:00+5:302023-10-31T14:38:29+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup PAK vs BAN Live : Shaheen Afridi becomes the fastest pacer and third-fastest overall to reach 100 ODI wickets by matches, Video | PAK vs BAN Live : शाहीन आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड; भारताच्या जसप्रीत बुमराहलाही हे जमलं नाही, Video

PAK vs BAN Live : शाहीन आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड; भारताच्या जसप्रीत बुमराहलाही हे जमलं नाही, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup PAK vs BAN Live : वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान वाचवण्यासाठी धडपडणारे दोन संघ पाकिस्तान-बांगलादेश आज कोलकाताच्या ईडन गार्डनवर भिडत आहेत. बांगलादेशचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे, तर पाकिस्तानला अजूनही आशेचा किरण दिसतोय... त्यामुळे आज त्यांच्याकडून दमदार खेळ पाहायला मिळेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. शादाब खान दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकला आहे, तर इमाम-उल-हकच्या जागी फखर जमानची एन्ट्री झाली आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात बांगलादेसचा तनझिद हसनला पायचीत केले आणि ही त्याची वन डे क्रिकेटमधील १०० वी विकेट ठरली.

बाबर आजमचे खाजगी चॅट लीक; शाहिद आफ्रिदीची टीका, म्हणाला, याने आपल्याच देशाची बदनामी


पाकिस्तानकडून सर्वात कमी ५१ सामन्यांत १०० विकेट्स घेण्याचा पराक्रम शाहीनने नावावर केला आणि त्याने साकलेन मुश्ताक ( ५३) याचा विक्रम मोडला. नेपाळचा संदीप लामिछाने ( ४२) व अफगाणिस्तानचा राशीद खान ( ४४) हे आघाडीवर आहेत. शाहीनचा तिसरा क्रमांक येतो. जलदगती गोलंदाजांमध्ये शाहीनने सर्वात वेगाने १०० विकेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड नाववार केला . पण आणि त्याने मिचेल स्टार्कला ( ५२) मागे टाकले. भारताच्या जसप्रीत बुमराहला हा पल्ला गाठण्यासाठी ५७ सामने लागले. पुढच्याच षटकात शाहीनने नजमूल शांतोला ( ४) बाद केले. बांगलादेशची अवस्था ६ षटकांत २ बाद २३ झाली आहे. 


बांगलादेश - लिटन दास, तनझिद हसन, नजमुल शांतो, शाकिब अल हसन, मुश्फीकर रहिम, महमुदुल्लाह, तोवहिद हृदोय, मेहिदी सहन मिराझ, तस्किन अहमद, मुस्ताफिजूर रहमान, शोरीफुल इस्लाम.

पाकिस्तान - अब्दुल्लाह शफिक, फखर जमान, बाबर आजम, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, आघा सलमान, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, मोहम्मद वासीम ज्युनियर, हॅरीस रौफ   

Web Title: ICC ODI World Cup PAK vs BAN Live : Shaheen Afridi becomes the fastest pacer and third-fastest overall to reach 100 ODI wickets by matches, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.