पाकिस्तान स्पर्धेबाहेर फेकले गेले! कोलकाताहून परतीचं विमान पक्के झाले

ICC ODI World Cup PAK vs ENG Live : पाकिस्तान संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास अखेर संपुष्टात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 07:01 PM2023-11-11T19:01:48+5:302023-11-11T19:04:49+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup PAK vs ENG Live : CONFIRMED - PAKISTAN OUT OF THIS WORLD CUP 2023, check Semifinals schedule  | पाकिस्तान स्पर्धेबाहेर फेकले गेले! कोलकाताहून परतीचं विमान पक्के झाले

पाकिस्तान स्पर्धेबाहेर फेकले गेले! कोलकाताहून परतीचं विमान पक्के झाले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup PAK vs ENG Live : पाकिस्तान संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास अखेर संपुष्टात आला. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले ३३८ धावांचे लक्ष्य त्यांनी ६.४ षटकांत पार केले असते तर पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला असता. पण, त्यांना ७ षटकांत २ बाद ३० धावाच करता आल्या आणि ते स्पर्धेबाहेर फेकले गेले. आता त्यांना कोलकाताहूनच थेट परतीचं विमान पकडावे लागणार आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत १५ नोव्हेंबरला भारत-न्यूझीलंड ( मुंबई) आणि १६ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका ( कोलकाता) अशा लढती होतील.  

Image
डेवीड मलान ( ३१) व जॉनी बेअरस्टो ( ५९) यांनी ८२ धावांची भागीदारी केली.  जो रूट व बेन स्टोक्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३१ चेंडूंत १३२ धावांची भागीदारी केली. मागील सामन्यातील शतकवीर स्टोक्सने आज ७६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ८४ धावा चोपल्या.  जो रूटही ७२ चेंडूंत ६० धावांवर शाहीनच्या गोलंदाजीवर बाद झाला. जॉस बटलर आणि हॅरी ब्रुक यांनी २६ चेंडूंत ४२ धावांची भागीदारी केली. ब्रुकने १७ चेंडूंत ३० धावा कुटल्या. बटलर १७ चेंडूंत २७ धावांवर रन आऊट झाला. इंग्लंडने ५० षटकांत ९ बाद ३३७ धावा केल्या. 


पाकिस्तानची मागील ६ वन डे वर्ल्ड कपमधील कामगिरी 
२००३ - उपांत्य फेरीसाठी पात्र नाही
२००७ - उपांत्य फेरीसाठी पात्र नाही
२०११ - उपांत्य फेरीत पराभव  
२०१५ - उपांत्य फेरीसाठी पात्र नाही
२०१९ -उपांत्य फेरीसाठी पात्र नाही
२०२३ - उपांत्य फेरीसाठी पात्र नाही 

Web Title: ICC ODI World Cup PAK vs ENG Live : CONFIRMED - PAKISTAN OUT OF THIS WORLD CUP 2023, check Semifinals schedule 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.