निम्मा संघ माघारी, पाकिस्तानी फलंदाजाचे 'नाटक' सुरू; खेळपट्टीवर बसला मारून फतकल, Video 

ICC ODI World Cup PAK vs ENG Live : पाकिस्तानने या वर्ल्ड कप स्पर्धेत चाहत्यांना निराश केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 08:25 PM2023-11-11T20:25:30+5:302023-11-11T20:27:23+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup PAK vs ENG Live : Pakistan 100-4 with Mohammad Rizwan dismissed for 36, he got cramp after getting out, video  | निम्मा संघ माघारी, पाकिस्तानी फलंदाजाचे 'नाटक' सुरू; खेळपट्टीवर बसला मारून फतकल, Video 

निम्मा संघ माघारी, पाकिस्तानी फलंदाजाचे 'नाटक' सुरू; खेळपट्टीवर बसला मारून फतकल, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup PAK vs ENG Live : पाकिस्तानने या वर्ल्ड कप स्पर्धेत चाहत्यांना निराश केले. श्रीलंकेविरुद्ध विक्रमी धावसंख्येचा पाठलाग केल्यानतंर पाकिस्तान ही स्पर्धा गाजवेल असे वाटले होते. पण, भारताने त्यांना लोळवले अन् त्यांची गाडी घरंगळत गेली. आज इंग्लंडविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी शरणागती पत्करलेली दिसतेय. मोहम्मद रिझवान त्याच्या फलंदाजासही नौटंकीमुळेही चर्चेत आलेला आजही तेच दिसले. 


प्रथम फलंदाजीला येताना इंग्लंडच्या डेवीड मलान ( ३१) व जॉनी बेअरस्टो ( ५९) यांनी ८२ धावांची भागीदारी केली.  जो रूट व बेन स्टोक्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३१ चेंडूंत १३२ धावांची भागीदारी केली. मागील सामन्यातील शतकवीर स्टोक्सने आज ७६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ८४ धावा चोपल्या.  जो रूटही ७२ चेंडूंत ६० धावांवर शाहीनच्या गोलंदाजीवर बाद झाला. जॉस बटलर आणि हॅरी ब्रुक यांनी २६ चेंडूंत ४२ धावांची भागीदारी केली. ब्रुकने १७ चेंडूंत ३० धावा कुटल्या. बटलर १७ चेंडूंत २७ धावांवर रन आऊट झाला. इंग्लंडने ५० षटकांत ९ बाद ३३७ धावा केल्या.  


उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तानला ४० चेंडूंत हे लक्ष्य पार करणे आवश्यक होते, पण ते अशक्य होते आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. अब्दुल्लाह शफिक ( ०) व फखर जमान ( १) हे अपयशी ठरले. कर्णधार बाबर आजमने ३८ धावा केल्या. मोहम्मद रिझवान ३६ धावांवर त्रिफळाचीत झाला. पाठोपाठ सौद शकीलही ( २९) बाद झाल्याने पाकिस्तानचा निम्मा संघ २७.५ षटकांत १२६ धावांत माघारी परतला. 

Web Title: ICC ODI World Cup PAK vs ENG Live : Pakistan 100-4 with Mohammad Rizwan dismissed for 36, he got cramp after getting out, video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.