ICC ODI World Cup PAK vs NED : पाकिस्ताननेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला, परंतु त्यांचा खेळ पाहून चाहते काही खूश दिसले नाहीत. नेदरलँड्सच्या बॅस डी लीडने ( Bas De Leede ) आज पाकिस्तानचे धाबे दणाणून सोडले. ४ विकेट्ससोबत त्याने अर्धशतकी खेळी करून वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान पटकावला. शिवाय वर्ल्ड कप स्पर्धेत असा पराक्रम करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला. हॅरिस रौफने ३, तर हसन अलीने २ विकेट्स घेतल्या.
PAK vs NED : कॉमेडी ! पाकिस्तानी खेळाडू १ रनसाठी ३ वेळा पळाला, मग झाली फजिती, Video
नेदरलँड्सची सुरुवात काही खास झाली नाही. मॅक्स ओ'डोड ( ५) आणि कॉलिन आर्कमन ( १७) यांना अनुक्रमे हसन अली व इफ्तिखार अहमद यांनी माघारी पाठवले. विक्रमजीत सिंग आणि बॅस डी लीडने डाव सावरला आणि ७० धावांची भागीदारी करून पाकिस्तानचे टेंशन वाढवले. शादाब खानने ही भागीदारी तोडली. विक्रमजीत ६७ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ५२ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर हॅरीस रौफने दोन धक्के देताना तेजा निदामनुरू ( ५) व कर्णधार स्कॉट एडवर्ड ( ०) यांना माघारी पाठवून पाकिस्तानला सामन्यात पुनरागमन करून दिले. ४ विकेट्स घेणाऱ्या डी लीडने अर्धशतक झळकावून नेदरलँड्ससाठी खिंड लढवली. वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अशी अष्टपैलू कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
वडिलांच्या अपमानाचा घेतला बदला, नेदरलँड्सच्या Bas de Leede पाकिस्तानला रडवले, Video
नेदरलँड्सला २० षटकांत १३७ धावा करायच्या होत्या आणि त्यांच्या हातात ५ विकेट्स होत्या. त्यामुळे सामन्यातील चुरस वाढली होती आणि पाकिस्तानचे चाहते टेंशनमध्ये दिसले. शाहीन आफ्रिदीने त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले आणि त्याने साकीब जुल्फिकारला ( १०) पायचीत केले. त्यानंतर पुढच्या षटकात मोहम्मद नवाजने पाकिस्तानला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. डी लीड ६७ धावांवर त्रिफळाचीत झाला. रोलेफ व्हॅन डेर मर्वे ( ४) रन आऊट झाल्याने नेदरलँड्सच्या आशा मावळल्या. हसन अलीने नेदरलँड्सला ९व्या धक्का देताना आर्यन दत्तचा त्रिफळा उडवला. नेदरलँड्सचा संघ २०५ धावांवर ऑल आऊट झाला आणि पाकिस्तानने ८१ धावांनी सामना जिंकला.
तत्पूर्वी, नेदरलँड्सच्या बॅस डी लीडने ( Bas De Leede ) सर्वाधिक ४ विकेट्स घेत आजचा सामना गाजवला. फखर जमान ( १२), इमाम-उल-हक ( १५) आणि बाबर आजम ( ५) हे ३८ धावांवर माघारी परतले होते. मोहम्मद रिझवान ( ६८) व सौद शकील ( ६८) यांनी ११४ चेंडूंत १२० धावा जोडल्या. शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांनी ६० धावांची भागीदारी करून पाकिस्तानला मजबूत स्थितीत आणले. शादाब ३२ धावांववर त्रिफळाचीत झाला. डी लीडने पुढच्या षटकात हसन अलीला गोल्डन डकवर माघारी पाठवले आणि ही त्याची चौथी विकेट ठरली. मोहम्मद नवाज ( ३९) रन आऊट झाला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४९ षटकांत २८६ धावांवर तंबूत परतला.
Web Title: ICC ODI World Cup PAK vs NED : Bas De Leede 4/62 with the ball then 67 (69) runs, PAKISTAN BEAT NETHERLANDS BY 81 RUNS
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.