ICC ODI World Cup PAK vs NED : ७ वर्षानंतर भारतात वर्ल्ड कप स्पर्धा खेळणाऱ्या पाकिस्तानचे हैदराबादमध्ये जंगी स्वागत झाले. भारतीयांनी दिलेलं प्रेम पाहून बाबर आजमसह सर्व सहकारी भावनिक झाले होते. आज पाकिस्तानने वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेला सुरुवात केली आणि नेदरलँड्सविरुद्ध पहिली मॅच खेळत आहेत. नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि बाबर आजमने आम्ही ३०० पार जाण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. पण, नेदलँड्सने त्यांची गोची केली आहे.
फखर जमान आणि इमाम-उल-हक यांना आश्वासक सुरुवात करून देता आली नाही. फखरने १५ चेंडूंत ३ चौकारांसह १२ धावा केल्या, परंतु चौथ्या षटकात लॉगन व्हॅन बीकने स्वतःच्याच गोलंदाजीवर अप्रतिम रिटर्न झेल घेतला. फखरला माघारी जावे लागले. कर्णधार बाबर आजमकडून आज बऱ्याच अपेक्षा होत्या, परंतु तोही कॉलीन आर्कमनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. इमामला ( १५) पॉल व्हॅन मीकेरनेने बाऊन्सरवर फटका मारण्यास भाग पाडले अन् तो झेलबाद झाला. पाकिस्तानचे तीन फलंदाज ३८ धावांवर माघारी परतले.
Web Title: ICC ODI World Cup PAK vs NED : Fakhar gone, Babar gone, Imam gone; Pakistan in big big trouble with 38 for 3 against Netherlands
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.