Join us  

पाकिस्तानने २२ पैकी १३.२ षटकं निर्धाव खेळली; दक्षिण आफ्रिकेसमोर गोची, निम्मा संघ माघारी

ICC ODI World Cup PAK vs SA Live : पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि आफ्रिकेने त्यांची गोची केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 4:23 PM

Open in App

ICC ODI World Cup PAK vs SA Live : दक्षिण आफ्रिकेने १९९९मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत ( वन डे व ट्वेंटी-२०) शेवटचं पाकिस्तानला पराभूत केले होता आणि त्यानंतर सहा सामन्यांत त्यांची हार झाली आहे. पण, यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील आफ्रिकेचा संघ सुसाट फॉर्मात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि आफ्रिकेने त्यांची गोची केली. पाकिस्तानची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे डॉट बॉल आणि आजही त्यानेच घात झाला. इनिंग्जच्या २२ षटकांत त्यांनी ८० डॉट बॉल खेळले म्हणजे जवळपास १३.२ षटकं त्यांनी धावाच केल्या नाहीत. 

पाकिस्तानी रडायला लागले! २ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजासोबत उकरून काढलं भांडण

सलामीवीर अब्दुल्लाह शफिक ( ९) आणि इमाम-उल-हक ( १२) यांना मार्को यानसेनने लगेच माघारी पाठवले. यानसेनच्या पुढच्याच चेंडूवर रिझवान बाद झाला असता. रिझवानने सरळ मारलेला चेंडू टीपण्यासाठी यानसेनने हवेत झेप घेतली, पण सुदैवाने पाकिस्तानी खेळाडू वाचला. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या १० षटकांत सर्वाधिक १० विकेट्स घेणारा यानसेन हा एकमेव खेळाडू आहे. दिलशान मधुशंका ( ५), रिसी टॉपली ( ४) यांचा त्यानंतर क्रमांक येतो.

 बाबर आजम आणि रिझवान या अनुभवी जोडीने पाकिस्तानची पडझड थांबवली होती. रिझवान आक्रमक फटकेबाजी करताना दिसला, परंतु गेराल्ड कोएत्झीच्या बाऊन्सरवर तो फसला. रिझवान २७ चेंडूंत ३१ धावांवर यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या हाती झेल देऊन परतला आणि बाबरसोबत त्याची ४८ ( ५६ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली. डॉट बॉल ही पुन्हा पाकिस्तानची डोकेदुखी ठरली आणि त्यामुळे फलंदाजांवर दडपण आलेलं पाहायला मिळालं. बाबर व इफ्तिखार अहमद ( २१) यांनी चौथ्या विकेटसाठी ५६ चेंडूंत ४३ धावा जोडल्या. तब्रेझ शम्सीला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इफ्तिखार सीमारेषेनजीक झेलबाद झाला.

दडपणात बाबरने संयमी अर्धशतक पूर्ण केले, परंतु शम्सीने त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. शम्सीच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बाबरच्या गोल्व्ह्जला घासून यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. बाबरला ६५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ५० धावांवर माघारी जावे लागले आणि पाकिस्तानचा निम्मा संघ २७.५ षटकांत १४१ धावांवर तंबूत परतला. 

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपबाबर आजमपाकिस्तानद. आफ्रिका