Join us  

आघाडी ढेपाळली, बिघाडी झाली; शेपटाने पाकिस्तानची लाज वाचवली, आफ्रिकेसमोर कोंडी

ICC ODI World Cup PAK vs SA Live :  पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांनी आज पुन्हा एकदा शरणागती पत्करली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 5:43 PM

Open in App

ICC ODI World Cup PAK vs SA Live :  पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांनी आज पुन्हा एकदा शरणागती पत्करली. फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांन टिच्चून मारा केला आणि पाकिस्तानचा गड कोसळून टाकला. कर्णधार बाबर आजमने संयमी अर्धशतक झळकावले, सौद शकील व शाबाद खान यांनी चांगली फटकेबाजी केली. तब्रेझ शम्सी ( ४-६०), मार्को यानसेन ( ३-४३) आणि गेराल्ड कोएत्झी यांनी दमदार मारा केला. 

बाबर आजमच्या विकेटवरून पाकिस्तान्यांची रडारड! चिटींग झाल्याचा आरोप, पाहा Video 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीर अब्दुल्लाह शफिक ( ९) आणि इमाम-उल-हक ( १२) यांना मार्को यानसेनने माघारी पाठवले. मोहम्मद रिझवानला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले. त्याने बाबर आजमसह तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. गेराल्ड कोएत्झीच्या बाऊन्सरवर रिझवान ( ३१) झेलबाद झाला. त्यानंतर बाबर व इफ्तिखार अहमद ( २१) यांनी चौथ्या विकेटसाठी ४३ धावा जोडल्या. तब्रेझ शम्सीने आधी इफ्तिखार व नंतर बाबरला ( ५०) बाद केले. पाकिस्तानचा निम्मा संघ २७.५ षटकांत १४१ धावांवर तंबूत पाठवला. 

बाबरचा आजचा खेळही संथ राहिला. पण, शादाब खान आणि  सौद शकील यांनी आक्रमक खेळ करून पाकिस्तानला पूर्वस्थितीत आणले. या दोघांनी ७१ चेंडूंत ८४ धावा जोडल्या. कोएत्झीने पुन्हा एकदा सेट जोडी तोडली. शादाब  ३६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४३ धावांवर झेलबाद झाला. शम्सी आज पाकिस्तानी फलंदाजांना फिरकीवर नाचवले. त्याने ४३व्या षटकात शकीलची ( ५२) विकेट मिळवून दिली आणि शाहिन आफ्रिदीलाही ( २) गुंडाळले. मोहम्मद नवाज २४ धावांची खेळी करून यानसेनच्या गोलंदाजीवर बाद झाला.  पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४६.४ षटकांत २७० धावांवर तंबूत परतला.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानद. आफ्रिकाबाबर आजम