PAK vs SA Live : Run Out करायचं सोडून, पाकिस्तानी खेळाडूने चेंडू सहकाऱ्याला फेकून मारला अन्... 

ICC ODI World Cup PAK vs SA Live : पाकिस्तानी आणि त्यांची फिल्डींग हा नेहमीच चर्चेत राहिलेला विषय आहे.. यंदाच्या स्पर्धेतही त्यांच्याकडून गचाळ क्षेत्ररक्षण झालेले पाहायला मिळाले, आज तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 07:09 PM2023-10-27T19:09:17+5:302023-10-27T19:14:59+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup PAK vs SA Live : Salman Ali Agha and instead of hitting the stumps, he throws the ball at Mohammad Nawaz and nearly injures him  | PAK vs SA Live : Run Out करायचं सोडून, पाकिस्तानी खेळाडूने चेंडू सहकाऱ्याला फेकून मारला अन्... 

PAK vs SA Live : Run Out करायचं सोडून, पाकिस्तानी खेळाडूने चेंडू सहकाऱ्याला फेकून मारला अन्... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup PAK vs SA Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या क्विंटन डी कॉकने आक्रमक शैलीने फटकेबाजी केली. शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्याच षटकात त्याने ४,१w,४,४,४,२,० अशी फटकेबाजी केली. पण, पुढच्याच षटकात शाहीनले त्याला बाद केले. क्विंटन १४ चेंडूंत २४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर सामन्यात मजेशीर प्रसंग घडला... 


पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांन टिच्चून मारा केला आणि पाकिस्तानचा संपूर्ण संघ २७० धावांत माघारी परतला. कर्णधार बाबर आजम आणि सौद शकील यांनी अर्धशतक झळकावले, तर शाबाद खानने चांगली फटकेबाजी केली. तब्रेझ शम्सीने ४, मार्को यानसेनने ३ आणि गेराल्ड कोएत्झीने २ विकेट्स घेतल्या.  मोहम्मद रिझवानने ( ३१) बाबरसह तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची, तर बाबर ( ५०) व इफ्तिखार अहमद ( २१) यांनी चौथ्या विकेटसाठी ४३ धावा जोडल्या. शादाब खान ( ४३) आणि  सौद शकील ( ५२) यांनी आक्रमक खेळ करून ७१ चेंडूंत ८४ धावा जोडल्या. मोहम्मद नवाजने २४ धावांची खेळी केली. 


डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर फिल्डिंग करताना शादाब खान जखमी झाला आणि त्याला प्राथमिक उपचार घ्यावे लागले. स्प्रे मारून तो पुन्हा मैदानावर आला. एक खेळाडू गंभीर जखमी होण्यापासून वाचलेला असताना मोहम्मद नवाज जखमी होता होता वाचला... टेम्बा बवूमाने मिड ऑफच्या दिशेने चेंडू मारून एक धाव घेण्यासाठी पळाला. सलमान अली आघाने चेंडू स्टम्पवर मारण्याऐवजी गोलंदाज नवाजच्या दिशेने वेगाने फेकला. नशीबाने नवाजला गंभीर दुखापत झाली नाही. पण, हा प्रकार पाहून सारेच हसू लागले.

Web Title: ICC ODI World Cup PAK vs SA Live : Salman Ali Agha and instead of hitting the stumps, he throws the ball at Mohammad Nawaz and nearly injures him 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.