टेक्निकल 'लोचा'! रॅसी व्हॅन डेर ड्युसेनच्या विकेटने गोंधळ, पाकिस्तानवर भडकले नेटिझन्स

ICC ODI World Cup PAK vs SA Live : आयसीसी वन डे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 08:53 PM2023-10-27T20:53:09+5:302023-10-27T20:53:30+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup PAK vs SA Live : Wickets missing turned into an umpire's call, Unlucky Rassie Van Der Dussen. | टेक्निकल 'लोचा'! रॅसी व्हॅन डेर ड्युसेनच्या विकेटने गोंधळ, पाकिस्तानवर भडकले नेटिझन्स

टेक्निकल 'लोचा'! रॅसी व्हॅन डेर ड्युसेनच्या विकेटने गोंधळ, पाकिस्तानवर भडकले नेटिझन्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup PAK vs SA Live : आयसीसी वन डे वर्ल्ड कपमध्येपाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना सुरू आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून २७० धावा केल्या आणि प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रॅसी व्हॅन डेर ड्युसेनवर टेक्निकल लोचामुळे अन्याय झाला. पायचीतची अपील झाली आणि त्यावर रिव्ह्यू घेतला गेला. पण, त्यात प्रचंड गडबड पाहायला मिळाली. त्यामुळे  पाकिस्तानला विकेट दिल्यामुळे चाहत्यांचा राग अनावर झाला आहे. 


दक्षिण आफ्रिकेच्या ६७ धावांत दोन विकेट पडल्या होत्या . यानंतर रॅसी व्हॅन डेर ड्युसेन आणि एडन मार्करम यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी झाली.  डावाच्या १९व्या षटकात उसामा मीरचा पाचवा चेंडू रॅसीच्या पॅडला लागला. यावर मैदानावरील पंचांनी रॅसीला आऊट दिले. ज्यावर दक्षिण आफ्रिकेने DRS घेतला. टीव्हीवर रिप्ले दाखवला जात असताना स्क्रीनवर काहीतरी गडबड दिसली. तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर असे काहीही नव्हते. जेव्हा टेलिव्हिजन स्क्रीनवर रिप्ले पुन्हा दाखवण्यात आला तेव्हा चेंडू विकेट्सवर आदळत होता आणि अंपायरच्या कॉलमुळे रॅसीला आऊट देण्यात आले. 


रॅसी ३९ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. त्यानंतर ऑनलाइन ओटीटी प्लॅटफॉर्मचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये चेंडू विकेट्सवर आदळत नसल्याचे दिसले. जे नंतर रिप्ले मध्ये दाखवले होते. तो अंपायरचा कॉल दाखवत होता. या दोन स्क्रिनशॉट्समुळे रॅसीच्या विकेटवरून खळबळ उडाली. रॅसीच्या बाद झाल्याने आफ्रिकेची तिसरी विकेट १२१ धावांवर पडली.  


 

Web Title: ICC ODI World Cup PAK vs SA Live : Wickets missing turned into an umpire's call, Unlucky Rassie Van Der Dussen.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.