Join us  

बाबर आजमच्या विकेटवरून पाकिस्तान्यांची रडारड! चिटींग झाल्याचा आरोप, पाहा Video 

ICC ODI World Cup PAK vs SA Live : पाकिस्तानची आज करो व मारो लढतीत दक्षिण आफ्रिकेसमोर हाराकिरी झालेली पाहायला मिळतेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 4:56 PM

Open in App

ICC ODI World Cup PAK vs SA Live : पाकिस्तानची आज करो व मारो लढतीत दक्षिण आफ्रिकेसमोर हाराकिरी झालेली पाहायला मिळतेय... सलामीवीरांच्या अपयशानंतर कर्णधार बाबर आजमने ( Babar Azam) पाकिस्तानचा डाव सावरला होता. पण, तब्रेझ शम्सीच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. स्वीप मारण्यासाठी गेलेल्या बाबरला चेंडू कसा फिरला हेच कळले नाही. यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने तो टिपला, पण त्याच्याकडून किंवा शम्सीकडून झेलचे अपीलच झाले नाही. चर्चा केल्यानंतर आफ्रिकेने DRS चा निर्णय घेतला अन् त्यात चेंडू ग्लोव्ह्जला घासून गेल्याचे दिसले. हलकं स्पाईक दिसला अन् बाबरला माघारी जावे लागले. पण, तो आऊट नव्हताच असा दावा पाकिस्तान्यांकडून केला जातोय. 

पाकिस्तानने २२ पैकी १३.२ षटकं निर्धाव खेळली; दक्षिण आफ्रिकेसमोर गोची, निम्मा संघ माघारी

सलामीवीर अब्दुल्लाह शफिक ( ९) आणि इमाम-उल-हक ( १२) यांना मार्को यानसेनने लगेच माघारी पाठवले. यानसेनच्या पुढच्याच चेंडूवर रिझवान बाद झाला असता. रिझवानने सरळ मारलेला चेंडू टीपण्यासाठी यानसेनने हवेत झेप घेतली, पण सुदैवाने पाकिस्तानी खेळाडू वाचला. बाबर आजम आणि रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. गेराल्ड कोएत्झीच्या बाऊन्सरवर रिझवान ( ३१) झेल देऊन परतला. बाबर व इफ्तिखार अहमद ( २१) यांनी चौथ्या विकेटसाठी ५६ चेंडूंत ४३ धावा जोडल्या. तब्रेझ शम्सीने आधी इफ्तिखार व नंतर बाबरला ( ५०) बाद केले. पाकिस्तानचा निम्मा संघ २७.५ षटकांत १४१ धावांवर तंबूत परतला. 

बाबर आजमची यंदाच्या वर्ल्ड कपमधील कामगिरी 5(18) वि. नेदरलँड्स10(15) वि. श्रीलंका50(58) वि. भारत18(14) वि. ऑस्ट्रेलिया74(92) वि. अफगाणिस्तान50(65) वि. दक्षिण आफ्रिका

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपबाबर आजमपाकिस्तानद. आफ्रिका