ICC ODI World Cup PAK vs SL Live : पाकिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत २६५ धावांच्या वर लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही. १९९२च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध २६३ धावांचा त्यांनी यशस्वी पाठलाग केला होता. आज त्यांच्यासमोर ३४५ धावांचे लक्ष्य होते आणि अर्थात त्याचे दडपण त्यांच्याव आलेच. इमाम-उल-हक पुन्हा अपयशी ठरला. त्यात कर्णधार बाबर आजमनेही ( Babar Azam) निराश केल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाच्या भेदक माऱ्यासमोर दोन्ही फलंदाज बाद झाले.
PAK vs SL Live : पाकिस्तानी खेळाडूने बाऊंड्री लाईन मागे ढकलली? म्हणून शतकवीर मेंडिसची विकेट मिळाली, Video
सलामीवीर कुसल परेरा ( ०) दुसऱ्याच षटकात माघारी परतल्यानंतर मेंडिस आणि पथूम निसांका ( ५१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी १०२ धावांची भागीदारी केली. मेंडिस आणि सदीरा समराविक्रमा यांनीही ६९ चेंडूंत १११ धावांची भागीदारी केली. मेंडिस ७७ चेंडूंत १४ चौकार व ६ षटकारांसह १२२ धावांवर बाद झाला. समराविक्रमाने पाचव्या विकेटसाठी धनंजया डी सिल्वासह ( २५) ६५ धावांची भागीदारी करून श्रीलंकेला पुन्हा ट्रॅकवर आणले. समराविक्रमा ८९ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०८ धावा केल्या. श्रीलंकेने ९ बाद ३४४ धावा उभ्या केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही संघाची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. २०१९मध्ये भारताने ५ बाद ३३६ धावा केल्या होत्या.
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना अचंबित केले. दिलशान मदुशंकाच्या बाऊन्सरवर इमाम-उल-हक ( १२) झेल देऊन माघारी परतला. त्याआधी त्याने वन डे क्रिकेटमध्ये जलद ३००० धावा करणाऱ्या फलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. हाशिम आमलाने ५७ इनिंग्जमध्ये हा पल्ला गाठला, तर इमामने ६७ इनिंग्ज खेळल्या. त्याने शे होप व फखर जमानची बरोबरी केली आणि बाबर आजम ( ६८) व व्हीव्ह रिचर्ड्स ( ६९) यांचा विक्रम मोडला. मदुशंकाने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. बाबर आजम १० धावांवर माघारी परतला.
Web Title: ICC ODI World Cup PAK vs SL Live : Babar Azam departs for 10(15) - Dilshan Madhushanka gets his second wicket, Pakistan 37/2 in 7.2 ov
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.