Join us  

PAK vs SL Live : Dhoniच्या तालमित घडलेल्या गोलंदाजाने पाकिस्तानला धक्का दिला, हेमंथाने अविश्वसनीय झेल टिपला, Video

ICC ODI World Cup PAK vs SL Live : निराशाजनक सुरुवातीनंतर पाकिस्तानचा डाव मोहम्मद रिझवान व २३ वर्षीय अब्दुल्लाह शफिक ( Abdullah Shafique) यांनी दमदार खेळ केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 9:21 PM

Open in App

ICC ODI World Cup PAK vs SL Live : निराशाजनक सुरुवातीनंतर पाकिस्तानचा डाव मोहम्मद रिझवान व २३ वर्षीय अब्दुल्लाह शफिक ( Abdullah Shafique) यांनी दमदार खेळ करून सावरला. श्रीलंका बॅकफूटवर जातेय असे दिसत असताना कर्णधाराने गोलंदाजीत बदल केला अन् MS Dhoniच्या तालमित IPL मध्ये घडलेल्या गोलंदाजाने कमाल केली. त्याने १७६ धावांची ही भागीदारी तोडताना पाकिस्तानला मोठा धक्का दिला. 

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना अचंबित केले. दिलशान मदुशंकाच्या बाऊन्सरवर इमाम-उल-हक ( १२) झेल देऊन माघारी परतला.  मदुशंकाने पाकिस्तानला मोठा धक्का देताना बाबर आजम १० धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद रिझवान व अब्दुल्लाह शफिक यांनी पाकिस्तानच्या डावाला आकार देताना शतकी भागीदारी केली. या दोघांनी चांगला जम बसवलेला आणि पाकिस्तान विजयाच्या दिशेने सरकत चाललेला.

शफिकने वर्ल्ड कप पदार्पणात ९७ चेंडूंत शतक झळकावले आणि असा पराक्रम करणारा तो पहिला पाकिस्तानी फलंदाज ठरला. रिझवाननेही अर्धशतकी खेळी करून त्याला चांगली साथ दिलीच होती. वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावणारा शफिक चौथा पाकिस्तानी फलंदाज ठरला. यापूर्वी इम्रान खान ( १८३*, १९८३), जावेद मियाँदाद ( १०३, १९८७) आणि सलीम मलिक ( १००, १९८७) यांनी हा पराक्रम केला होता. 

श्रीलंकेच्या कर्णधाराने गोलंदाजीत बदल करताना मतिषा पथिराणाला गोलंदाजीला आणले आणि त्याने ३४व्या षटकात पाकिस्तानला धक्का दिला. शफिक १०३ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ११३ धावांवर झेलबाद झाला. बदली खेळाडू म्हणून आलेल्या हेमंथाने पॉईंटला अप्रतिम झेल घेतला.  रिझवानसोबत त्याची १७६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. वर्ल्ड कपमधील पाकिस्तानकडून ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. सईद अन्वर-वस्ती यांनी १९९९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १९४ धावा केल्या होत्या.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानश्रीलंका