PAK vs SL Live : चेंडू हातात होता, पण श्रीलंकेचा फलंदाज चतूर निघाला; पाकिस्तानचा 'पोपट'झाला

ICC ODI World Cup PAK vs SL Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्या विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानची हैदराबादमध्ये धुलाई झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 03:33 PM2023-10-10T15:33:43+5:302023-10-10T15:38:45+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup PAK vs SL Live : The direct-hit would have got  Pathum Nissanka easily despite a full-length dive, Rizwan has to break the stumps | PAK vs SL Live : चेंडू हातात होता, पण श्रीलंकेचा फलंदाज चतूर निघाला; पाकिस्तानचा 'पोपट'झाला

PAK vs SL Live : चेंडू हातात होता, पण श्रीलंकेचा फलंदाज चतूर निघाला; पाकिस्तानचा 'पोपट'झाला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup PAK vs SL Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्या विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानची हैदराबादमध्ये धुलाई झाली. दुसऱ्या षटकात विकेट पडूनही श्रीलंकेच्या फलंदाजांनी दमदार खेळ करून संघाला पुनरागमन करून दिले. शाहीन आफ्रिदी आणि इमाम-उल-हक यांनी सोडलेले झेल त्यांना महागात पडले. त्यात मोहम्मद रिझवान चेंडू हातात असूनही श्रीलंकेच्या पथूम निसांका (  Pathum Nissanka) बाद करू नाही शकला. श्रीलंकेचा फलंदाज चतूर निघाला.


श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु हसन अलीने दुसऱ्याच षटकात सलामीवीर कुसल परेराला ( ०) माघारी पाठवले.शाहीन आफ्रिदीचा फॉर्म आजही हरवलेला दिसला आणि त्याच्या हातातून एक झेलही सुटला गेला. त्यात त्याच्या बोटाला मार लागला अन् दुखापत घेऊन त्याने गोलंदाजी केली. इमाम उल हकनेही सातव्या षटकात कुसल मेंडिसला जीवदान दिले. ९व्या षटकात फिरकीपटू मोहम्मद नवाझला आणि १०व्या षटकात हॅरी रौफला गोलंदाजीला आणले. पण, मेंडिस आणि पथूम निसांका यांनी चांगले फटके लगावले. 


मेंडिस आणि निसांका यांच्या फटकेबाजीने पाकिस्तानला हैराण केले होते. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून श्रीलंकेचा डोलारा पुन्हा उभा केला. १६व्या षटकात शादाब खानने टाकलेला चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने मेंडिसने मारला अन् निसांका एक धाव घेण्यासाठी पळाला. पाकिस्तानच्या खेळाडूने यष्टिरक्षक रिझवानकडे वेळेत चेंडू फेकला होता अन् त्याने स्टम्प्सही उडवला. पण, निसांका चतूर निघाला. त्याने लगेच डाईव्ह मारत वेळेत क्रीजमध्ये बॅट सरकवली आणि पाकिस्तानचा पोपट झाला. मात्र, १८व्या षटकात शादाबच्या गोलंदाजीवर निसांका ५१ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. श्रीलंकेने १०७ धावांवर २ गडी गमावला. 



 

Web Title: ICC ODI World Cup PAK vs SL Live : The direct-hit would have got  Pathum Nissanka easily despite a full-length dive, Rizwan has to break the stumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.