१९९२ नंतर वर्ल्ड कपमध्ये गुणतालिकेत दिसतोय चमत्कार! १७० धावांमुळे इंग्लंडची वाचली लाज

ICC ODI World Cup SA vs ENG Live - गतविजेत्या इंग्लंडची वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवात अत्यंत सुमार झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 09:00 PM2023-10-21T21:00:18+5:302023-10-21T21:01:14+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup SA vs ENG Live : For the first time since 1992, all participating teams have opened their account in an ODI World Cup group stage, england With them reaching 170 they have avoided 10th position | १९९२ नंतर वर्ल्ड कपमध्ये गुणतालिकेत दिसतोय चमत्कार! १७० धावांमुळे इंग्लंडची वाचली लाज

१९९२ नंतर वर्ल्ड कपमध्ये गुणतालिकेत दिसतोय चमत्कार! १७० धावांमुळे इंग्लंडची वाचली लाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup SA vs ENG Live - गतविजेत्या इंग्लंडचीवन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवात अत्यंत सुमार झाली आहे. अफगाणिस्तानकडून हार पत्करल्यानंतर त्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले पाहायला मिळतेय आणि त्यात आज दक्षिण आफ्रिकेने वस्रत्रहणरण केले. आफ्रिकेच्या ४०० धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ १७० धावांत तंबूत परतला. आफ्रिकेने २२९ धावांनी दणदणीत विजय मिळवला, पण याच १७० धावांनी इंग्लंडची लाज वाचवली. १९९२ नंतर प्रथमच वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गुणतालिकेत मोठा चमत्कार घडलेला पाहायला मिळतोय....

क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचे जनक लाजीरवाण्या पद्धतीने हरले! दक्षिण आफ्रिकेने मैदान मारले


रिझा हेंड्रीक्स ( ८५) व  रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ६०) यांच्या १२१ धावांच्या भागीदारीने आफ्रिकेला मजबूत स्थितीत आणले.  कर्णधार एडन मार्कराम ( ४२) ने चांगली फटकेबाजी केली. हेनरिच क्लासेन व मार्को यानसेन यांनी ७७ धावांत १५१ धावांची भागीदारी केली. क्लासेन ६७ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारासह १०९ धावांवर त्रिफळाचीत झाला.  आफ्रिकेने ७ बाद ३९९ धावा केल्या. यानसेन ४२ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात, इंग्लंडचा संघ २२ षटकांत १७० धावांवर ऑल आऊट झाला. गेराल्ड कोएत्झीने ३ विकेट्स घेतल्या, तर लुंगी एनगिडी, मार्को यानसेन यांनी प्रत्येकी २ व केशव महाराज व कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. गुस अॅटकिसन ( ३५) व मार्क वूड यांनी ३३ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. वूड १७ चेंडूंत ४३ धावांवर नाबाद राहिला.  

Image

वर्ल्ड कप स्पर्धेतील आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या संघामधील धावांच्या बाबतीत हा दुसरा मोठा विजय ठरला. २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर २५७ धावांनी विजय मिळवला होता. इंग्लंडचा हा वन डे क्रिकेटमधील मोठा पराभव ठरला. यापूर्वी २०२२मध्ये ऑस्ट्रेलियाने मेलबर्नवर २२१ धावांनी विजय मिळवला होता. दरम्यान, इंग्लंडने बरोबर १७० धावा केल्याने ते गुणतालिकेत तळावर जाण्यापासून वाचले. त्यापेक्षा कमी धावा केल्या असत्या तर ते थेट दहाव्या क्रमांकावर गेले असले. आता त्यांचा नेट रन रेट -१.२४८ असा आहे आणि ते नवव्या क्रमांकावर राहिले. १९९२ नंतर प्रथमच साखळी फेरीत सर्व संघांनी गुणांचे खाते उघडले आहे.

  • न्यूझीलंड व भारत - ८ गुण
  • दक्षिण आफ्रिका - ६ गुण
  •  ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान - ४ गुण
  • बांगलादेश, नेदरलँड्स, श्रीलंका, इंग्लंड व अफगाणिस्तान - २ गुण  
     

Web Title: ICC ODI World Cup SA vs ENG Live : For the first time since 1992, all participating teams have opened their account in an ODI World Cup group stage, england With them reaching 170 they have avoided 10th position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.