ICC ODI World Cup SA vs NED Live : अफगाणिस्तान संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडला पराभवाचा धक्का देताना मोठा उलटफेर निकाल नोंदवला. आज तसेच काहीसे नेदरलँड्सकडून घडताना दिसतेय.. ५ बाद ८२ वरून नेदरलँड्सने जबरदस्त पुनरागमन करताना २४२ धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेच्या ४ फलंदाजांना ४४ धावांना माघारी पाठवून चमत्कार केला. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे ( Roelof van der Merwe) याने नेदरलँड्ससाठी फलंदाजीत योगदान दिलेच, त्यानंतर गोलंदाजीत दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
पावसाच्या व्यत्ययामुळे ४३-४३ षटकांचा हा सामना खेळवण्याचा निर्णय झाला. दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर नेदरलँड्सचा निम्मा संघ ८२ धावांवर तंबूत परतला होता. पण, कर्णधार स्कॉट एडवर्ड्स आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर खंबीरपणे उभा राहिला. त्याला सायब्रँड इगलब्रेच ( १९), तेजा निदामानुरू ( २०) , रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे ( २९) यांची साथ मिळाली. एडवर्ड्स आणि मर्वे यांनी ८व्या विकेटसाठी ३७ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. आर्यन दत्तने ९ चेंडूंत ३ षटकारांसह नाबाद २३ धावा केल्या. एडवर्डस ६९ चेंडूंत १० चौकार व १ षटकारांसह ७८ धावांवर नाबाद राहिला. नेदरल्ँड्सने ४३ षटकांत ८ बाद २४५ धावा केल्या. नेदरलँड्सने शेवटच्या ९ षटकांत १०९ धावा चोपल्या.
भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक अतिरिक्त धावा देणाऱ्या संघात दक्षिण आफ्रिकेने ( ३२) आज चौथे स्थान पटकावले. प्रत्युत्तरात आफ्रिकेला साजेशी सुरुवात करता नाही आळी. कॉलिन आर्कमनच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात क्विंटन डी कॉक ( २०) माघारी परतला अन् आफ्रिकेला ३६ धावांवर पहिला धक्का बसला. आफ्रिकेचाच माजी खेळाडू मर्वेने १०व्या षटकात टेम्बा बवुमाचा ( १६) त्रिफळा उडवून आफ्रिकेची गोची केली. त्याल पॉल व्हॅन मीकेरनने फॉर्मात असलेल्या एडन मार्करामचा त्रिफळा उडवला. रॅसी व्हॅन डेर ड्युसेनला ( ४) त्याचा चुकीचा फटका महागात पडला आणि मर्वेच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. आफ्रिकेचे ४ फलंदाज ४४ धावांत तंबूत परतले.
Web Title: ICC ODI World Cup SA vs NED Live : 44/4, SOUTH AFRICA IN BIG TROUBLE, NETHERLANDS HAVE STUNNED Proteas IN DHARAMSHALA, video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.