SA vs NED Live : दक्षिण आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम! नेदरलँड्सने वर्ल्ड कपमध्ये नोंदवला धक्कादायक निकाल 

ICC ODI World Cup SA vs NED Live : अफगाणिस्ताननंतर वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सने धक्कादायक निकालाची नोंद केली. अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडला ईंगा दाखवला होता, तर आज डच संघाने चोकर्सना पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:23 PM2023-10-17T22:23:15+5:302023-10-17T23:03:08+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup SA vs NED Live :Netherlands won by 38 runs against South Africa , HISTORY HAS BEEN CREATED IN DHARAMSHALA | SA vs NED Live : दक्षिण आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम! नेदरलँड्सने वर्ल्ड कपमध्ये नोंदवला धक्कादायक निकाल 

SA vs NED Live : दक्षिण आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम! नेदरलँड्सने वर्ल्ड कपमध्ये नोंदवला धक्कादायक निकाल 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup SA vs NED Live : नोव्हेंबर २०२२ मध्ये नेदरलँड्सने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून त्यांना स्पर्धेबाहेर फेकले होते. या पराभवाची जखम भरून येतेय, तोच वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सने पुन्हा एकदा आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम केला. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सच्या कृपेने नेदरलँड्सने सन्मानजनक पल्ला गाठला अन् त्यानंतर डच गोलंदाजांनी कहर केला. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी विजय मिळवणाऱ्या आफ्रिकेने आज 'चोकर्स' नावाला साजेसा खेळ केला. 

माजी खेळाडू ठरला वैरी! दक्षिण आफ्रिकेचे ४ फलंदाज परतले माघारी, नेदरलँड्स पडतायेत भारी, Video 

२४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेला साजेशी सुरुवात करता नाही आळी. कॉलिन आर्कमनच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात क्विंटन डी कॉक ( २०) माघारी परतला अन् आफ्रिकेला ३६ धावांवर पहिला धक्का बसला. आफ्रिकेचाच माजी खेळाडू मर्वेने १०व्या षटकात टेम्बा बवुमाचा ( १६) त्रिफळा उडवून आफ्रिकेची गोची केली. त्याल पॉल व्हॅन मीकेरनने फॉर्मात असलेल्या एडन मार्करामचा त्रिफळा उडवला. रॅसी व्हॅन डेर ड्युसेनला ( ४) त्याचा चुकीचा फटका महागात पडला आणि मर्वेच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला.   हेनरिच क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी डाव सावरला होता, परंतु व्हॅन बीकने पाचवा धक्का दिला. क्लासेन २८ धावांवर बाद झाला.  


 


मर्वेच्या गोलंदाजीवर मिलरने उत्तुंग फटका मारला होता आणि तो झेलबाद झाला असता, परंतु त्याला जीवदान मिळाले. पण, व्हॅन मीकेरनने मार्को यानसेनचा ( ९) त्रिफळा उडवून सहावा धक्का दिला. आफ्रिकेला १५ षटकांत ११७ धावांची गरज होती, परंतु त्यांचे केवळ ४ फलंदाज शिल्लक होते. मिलर आणि गेराल्ड कोएत्झी यांनी ३६ धावांची भागीदारी करून आशा जागवल्या होत्या, परंतु व्हॅन बीकने ३१व्या षटकांत मिलरचा ( ४३) त्रिफळा उडवला अन् आफ्रिकेचा पराभव जवळपास निश्चित केला.  त्यानंतर आफ्रिकेचा डाव गडगडला आणि नेदरलँड्सने धक्कादायक निकाल नोंदवला. आफ्रिकेचा संपूर्ण संघ २०७ धावांवर तंबूत परतला अन् नेदरलँड्सने ३८ धावांनी सामना जिंकला. केशव महाराजने ४० धावा केल्या.


तत्पूर्वी, आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर नेदरलँड्सचा निम्मा संघ ८२ धावांवर तंबूत परतला होता. पण, कर्णधार स्कॉट एडवर्ड्स आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर खंबीरपणे उभा राहिला. त्याला सायब्रँड इगलब्रेच ( १९),  तेजा निदामानुरू ( २०) , रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे ( २९) यांची साथ मिळाली. एडवर्ड्स आणि मर्वे यांनी ८व्या विकेटसाठी  ३७ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. आर्यन दत्तने ९ चेंडूंत ३ षटकारांसह नाबाद २३ धावा केल्या. एडवर्डस ६९ चेंडूंत १० चौकार व १ षटकारांसह ७८ धावांवर नाबाद राहिला. नेदरल्ँड्सने ४३ षटकांत ८ बाद २४५ धावा केल्या. नेदरलँड्सने शेवटच्या ९ षटकांत १०९ धावा चोपल्या.  

Web Title: ICC ODI World Cup SA vs NED Live :Netherlands won by 38 runs against South Africa , HISTORY HAS BEEN CREATED IN DHARAMSHALA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.