Join us  

क्विंटन डी कॉकचा रिव्हर्स स्वीप, चेंडू यंगच्या हातात; अम्पायर संभ्रमात अन् Not Out निर्णय 

ICC ODI World Cup SA vs NZ Live :  न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्याने नेहमी धक्कादायक निकाल नोंदवले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 4:01 PM

Open in App

ICC ODI World Cup SA vs NZ Live :  न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्याने नेहमी धक्कादायक निकाल नोंदवले आहेत. यात किवींचेच पारडे जड राहिले आहे, परंतु आज पुण्यात सुरू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग्जमध्ये सध्यातरी आफ्रिकेचे वर्चस्व दिसतेय. २००७ ( सुपर ८), २०११ ( उपांत्यपूर्व फेरी), २०१५ ( उपांत्य फेरी) आणि २०१९ ( बाद फेरी) या वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड आफ्रिकेच्या मार्गात नेहमी आडवा आला आहे. पण, यंदा आफ्रिकेचा फॉर्म जबरदस्त सुरू आहे. क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock ) तर मैदान गाजवतोय. पण, आत त्याच्याबाबतीत एक किस्सा दोन वेळा घडला अन् त्यामुळे अम्पायरही संभ्रमात आले. 

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पक्कं करण्यासाठी आता सर्वांना प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ सध्या सेफ झोनमध्ये असले तरी त्यांना एखादा पराभव महागात पडू शकतो. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा यांना किवी गोलंदाजांनी शांत ठेवले होते. ९व्या षटकात ट्रेंट बोल्टने आफ्रिकेचा कर्णधार बवुमाची ( २४) विकेट घेऊन ३८ धावांवर पहिला धक्का दिला. क्विंटन आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसन यांनी चांगला खेळ सुरू ठेवला आणि क्विंटनने अर्धशतक पूर्ण केले. क्विंटनने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत ७ इनिंग्जमध्ये आतापर्यंत ४८१* धावा केल्या आहेत. त्याने २०१५ व २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील १७ इनिंग्जमध्येही ( ४५०) मिळून इतक्या धावा केल्या नव्हत्या. 

ग्लेन फिलिप्स टाकत असलेल्या २४व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर क्विंटनने रिव्हर्स स्वीप मारला... चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने गेला आणि विल यंगने झेप घेत तो टिपला. जोरदार अपील झाले... किवी खेळाडू एकमेकांचे अभिनंदन करू लागले. पण, क्विंटन मैदानावरच उभा राहिला. अम्पायरकडूनही कोणताच निकाल आलेला नव्हता आणि त्यांनी तिसऱ्या पंचाकडे धाव घेतली. रिप्लेमध्ये चेंडू एक टप्पा यंगच्या हाती गेल्याचे दिसले अन् क्विंटन वाचला. वर्ल्ड कपच्या एका पर्वात आफ्रिकेकडून सर्वाधिक ४८६* धावांचा विक्रम क्विंटनने नावावर केला. २००७मध्ये जॅक कॅलिसने ४८५ आणि २०१५मध्ये एबी डिव्हिलियर्सने ४८२ धावा केल्या होत्या.   

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपक्विन्टन डि कॉकद. आफ्रिकान्यूझीलंड