Join us  

ICC ODI World Cup schedule announce: वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरला

ICC ODI World Cup schedule announce: भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 12:04 PM

Open in App

ICC ODI World Cup schedule announce: भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेला १०० दिवस शिल्लक असल्याचे औचित्य साधून मुंबईत एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. १ लाखपेक्षा जास्त क्षमता असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan) हा सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे. 

२०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे फायनलिस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ५ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. तीन दिवसानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. उपांत्य फेरीचे सामने १५ व १६ नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल. उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी मुंबई व कोलकाता यांची निवड केली गेली आहे, तर फायनल अहमदाबाद येथे होईल.

५ ऑक्टोबर - इंग्लंड वि. न्यूझीलंड, अहमदाबाद६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालिफायर १, हैदराबाद७ ऑक्टोबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, धर्मशाला७ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. क्वालिफायर २, दिल्ली८ ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई९ ऑक्टोबर - न्यूझीलंड वि. क्वालिफायर १, हैदराबाद१० ऑक्टोबर - इंग्लंड वि. बांगलादेश, धर्मशाला११ ऑक्टोबर - भारत वि. अफगाणिस्तान. दिल्ली१२ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालिफायर २, हैदराबाद१३ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, लखनौ१४ ऑक्टोबर - इंग्लंड वि. अफगाणिस्तान, दिल्ली१४ ऑक्टोबर - न्यूझीलंड वि. बांगलादेश, चेन्नई१५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहदाबाद१६ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर २, लखनौ१७ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. क्वालिफायर १, धर्मशाला१८ ऑक्टोबर - न्यूझिलंड वि. अफगाणिस्तान, चेन्नई१९ ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे२० ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बंगळुरू२१ ऑक्टोबर - इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका, मुंबई२१ ऑक्टोबर - क्वालिफायर १ वि. क्वालिफायर २, लखनौ२२ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझिलंड, धर्मशाला२३ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. अफगाणिस्तान , चेन्नई२४ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश, मुंबई२५ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर १, दिल्ली२६ ऑक्टोबर - इंग्लंड वि. क्वालिफायर २, बंगळुरू२७ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई२८ ऑक्टोबर- क्वालिफायर १ वि. बांगलादेश, कोलकाता२८ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. न्यूझिलंड, धर्मशाला२९ ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड, लखनौ३० ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. क्वालिायर २, पुणे३१ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता

  •  

१ नोव्हेंबर - न्यूझिलंड वि. दक्षिण आफ्रिका, पुणे२ नोव्हेंबर - भारत वि. क्वालिफायर २, मुंबई३ नोव्हेंबर - क्वालिफायर १ वि. अफगाणिस्तान, लखनौ४ नोव्हेंबर - इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, अहमदाबाद४ नोव्हेंबर - न्यूझिलंड वि. पाकिस्तान, बंगळुरू५ नोव्हेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता६ नोव्हेंबर - बांगलादेश वि. क्वालिफायर २, दिल्ली७ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, मुंबई८ नोव्हेंबर - इंग्लंड वि. क्वालिफायर १, पुणे९ नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. क्वालिफायर २, बंगळुरू१० नोव्हेंबर - दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान, अहमदाबाद११ नोव्हेंबर - भारत वि. क्वालिफायर १, बंगळुरू१२ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता१२ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, पुणे१५ नोव्हेंबर - पहिली सेमी फायनल, मुंबई१६ नोव्हेंबर - दुसरी सेमी फायनला, कोलकाता१९ नोव्हेंबर - फायनल, अहमदाबाद 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App