Join us  

नाटकं सुरूच! वेळापत्रक जाहीर झालं तरी पाकिस्तानचं वर्ल्ड कप खेळण्याचे निश्चित नाही, आता म्हणतात... 

ICC ODI World Cup schedule : आयसीसीने आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केले. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत ही वर्ल्ड कप स्पर्धा भारतातील १० विविध शहरांमध्ये खेळवली जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 3:19 PM

Open in App

ICC ODI World Cup schedule : आयसीसीने आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केले. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत ही वर्ल्ड कप स्पर्धा भारतातील १० विविध शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलिस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना अहमदाबाद येथे होणार आहे. पाकिस्तान त्यांचा पहिला सामना ६ ऑक्टोबरला क्वालिफायर १ विरुद्ध खेळणार आहे. १५ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान हा महामुकाबला होणार असल्याचे ICC ने जाहीर केले आहे. पण, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) नवीन नाटकं सुरू केली आहेत.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरला

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप वर्ल्ड कप स्पर्धेत संघाच्या खेळण्यावर स्पष्ट सांगितलेले नाही. भारतात या स्पर्धेसाठी यायचे की नाही यासाठी आता पाकिस्तान सरकारने परवानगी दिलेली नाही. वेळापत्रकानुसार पाकिस्तानचा पहिला सामना ६ ऑक्टोबरला होणार आहे. ''भारत दौऱ्यासाठी PCB ला पाकिस्तान सरकारच्या परवानगीची गरज असते. तसेच सामने कुठे खेळायचे याचीही परवानगी त्यांच्याकडून लागते. ही स्थिती काही आठवड्यांपूर्वी आयसीसीला जे सांगितले होते त्याच्याशी सुसंगत आहे. जेव्हा त्यांनी आमच्यासोबत ड्राफ्ट शेअर केला आणि आमचा अभिप्राय मागवला होता,''असे PCBच्या प्रवक्त्याने सांगितले.  

सरकारने परवानगी दिली तरच पाकिस्तानचा संघ भारतात वर्ल्ड कप खेळायला येईल. आशिया चषक २०२३ स्पर्धा ज्या पद्धतीने श्रीलंकेत हलवण्यास भाग पाडली, त्याने पाकिस्तान नाराज आहे. यजमान असूनही आशिया चषकाचे केवळ चार सामने पाकिस्तानात होणार आहेत, तर ९ सामने श्रीलंकेत होतील. यात भारत-पाकिस्तान या महामुकाबल्याचाही समावेश आहे. PCB आता पाकिस्तान सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहेत.  

पाकिस्तानचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक ( Pakistan WC Schedule)६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालिफायर १, हैदराबाद १२  ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालियर २, हैदराबाद१५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद२० ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बंगळुरू२३ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. अफगाणिस्तान, चेन्नई२७ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई  ३१ ऑक्टोबर- पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता४ नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. पाकिस्तान, बंगळुरू१२ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App