न्यूझीलंडचा दमदार खेळ, पाकिस्तानचा गणिताशी जमेना 'मेळ'; डोकं आपटायची आलीय वेळ

ICC ODI World Cup Semi Final Scenario : पाकिस्तानच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या आशा मावळल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 06:07 PM2023-11-09T18:07:22+5:302023-11-09T18:08:48+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup Semi Final Scenario : If New Zealand chases in 25 overs, Pakistan will need to win by 335 runs. | न्यूझीलंडचा दमदार खेळ, पाकिस्तानचा गणिताशी जमेना 'मेळ'; डोकं आपटायची आलीय वेळ

न्यूझीलंडचा दमदार खेळ, पाकिस्तानचा गणिताशी जमेना 'मेळ'; डोकं आपटायची आलीय वेळ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup Semi Final Scenario : पाकिस्तानच्यावन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या आशा मावळल्या आहेत. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातला सामना पावसामुळे वॉश आऊट होईल असा अंदाज व्यक्त झाल्याने पाकिस्तानच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. पण, न्यूझीलंडने ४६.७षटकांत श्रीलंकेचा संपूर्ण संघ १७१ धावांत तंबूत पाठवला. त्यामुळे न्यूझीलंडचा विजय पक्का होईल असेच वाटतेय, पण त्यानंतरही पाकिस्तानला संधी असेल. मात्र, हे आव्हान सोपं नक्की नसेल.


कुसल परेराने आज ( ५१) या वर्ल्ड कपमधील वेगवान अर्धशतक झळकावले. महीश तीक्षणाच्या नाबाद ३८ धावांच्या खेळीने श्रीलंकेला सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचवले. ट्रेंट बोल्टने ३ विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडकडून वर्ल्ड कपमध्ये ५० विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. कुसल परेराने या वर्ल्ड कमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले.  त्याने २८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा चोपल्या. ल्युकी फर्ग्युसन, रचिन रवींद्र व मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


पाकिस्तानसाठी गणित

  • न्यूझीलंडने हा सामना २५ षटकांत जिंकल्यास पाकिस्तानला शेवटच्या साखळी सामन्यात इंग्लंडवर ३३५ धावांनी विजय मिळवावा लागेल. इंग्लंडने प्रथम फलंदाजी केल्यास पाकिस्तान बाद होईल
  • जर न्यूझीलंडने ३५ षटकांत हे लक्ष्य पार केल्यास पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध धावांचा पाठलाग करताना ६ षटकांत १२० किंवा ७ षटकांत २०० धावा कराव्या लागतील.  
     

Web Title: ICC ODI World Cup Semi Final Scenario : If New Zealand chases in 25 overs, Pakistan will need to win by 335 runs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.