दक्षिण आफ्रिका vs ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा सामना! टीम इंडियाला भिडण्यासाठी ३ संघ शर्यतीत

ICC ODI World Cup Semi Scenarios : ग्लेन मॅक्सवेलच्या फटकेबाजीची झिंग अजूनही क्रिकेटप्रेमींच्या मनातून पूर्णपणे गेलेली नाही आणि ती जावी अशी चाहत्यांची इच्छाही नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 04:01 PM2023-11-08T16:01:30+5:302023-11-08T16:01:51+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup Semi Scenarios : South Africa Vs Australia in Semi Finals: Who will face Team India? Pakistan, New Zealand & Afghanistan in race | दक्षिण आफ्रिका vs ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा सामना! टीम इंडियाला भिडण्यासाठी ३ संघ शर्यतीत

दक्षिण आफ्रिका vs ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा सामना! टीम इंडियाला भिडण्यासाठी ३ संघ शर्यतीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup Semi Scenarios : ग्लेन मॅक्सवेलच्या फटकेबाजीची झिंग अजूनही क्रिकेटप्रेमींच्या मनातून पूर्णपणे गेलेली नाही आणि ती जावी अशी चाहत्यांची इच्छाही नाही.  ७ फलंदाज ९१ धावांवर माघारी परतले असताना विजयासाठी २०२ धावा हव्या असताना मॅक्सवेलने एकट्याने नाबाद २०१ धावा चोपल्या आणि ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत पोहोचवले. त्याने हा रोमहर्षक विजय मिळवून जर तरच्या गणिताचा चुराडा केला. उपांत्य फेरीची एक लढत पक्की झाली आहे आणि १६ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना होणार आहे. भारताविरुद्ध पहिल्या उपांत्य फेरीसाठी तीन संघ शर्यतीत आहेत, पण...


ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका दोनवेळा वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत खेळणार आहेत. १९९९मध्ये  सामना बरोबरीत सुटला होता आणि ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत आघाडीवर असल्याने त्यांना फायनलमध्ये प्रवेश मिळाला. २००७मध्ये ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सने मॅच जिंकली होती.  दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांचे प्रत्येकी १२ गुण आहेत. त्यांचे प्रत्येकी १ सामना जिंकून १४ गुण होतील आणि तरीही ते दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरच राहतील. त्यामुळे हे दोन संघ उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध खेळणार हे पक्कं आहे. भारतीय संघ १६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि एक मॅच जिंकून त्यांच्या खात्यात १८ गुण होतील. ते  अव्वलच राहतील.

उपांत्य फेरीच्या चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, अफगाणिस्तान व पाकिस्तान शर्यतीत आहेत. या तिन्ही संघांचे प्रत्येकी ८ गुण आहेत. 

भारत -न्यूझीलंड सेमीसाठी?
- अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेचा पराभव
- इंग्लंडकडून पाकिस्तानचा पराभव 

भारत-पाकिस्तान सेमीसाठी?
- इंग्लंडचा पराभव
- श्रीलंकेकडून न्यूझीलंडची हार किंवा सामना पावसामुळे वॉश आऊट  
- इंग्लंडवर किमान १३० धावांनी विजय 
 
भारत - अफगाणिस्तान सेमीसाठी?
- दक्षिण आफ्रिकेवर विजय
- श्रीलंकेकडून न्यूजीलंडची हार
- इंग्लंडकडून पाकिस्तनची हार
 

Web Title: ICC ODI World Cup Semi Scenarios : South Africa Vs Australia in Semi Finals: Who will face Team India? Pakistan, New Zealand & Afghanistan in race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.