Join us  

'हा शेवट नाही, जोपर्यंत विश्वचषक जिंकत नाही...' शुबमन गिलने केला दृधनिश्चय

शुबमन गिलचा हा पहिलाच वर्ल्ड कप होता, यातील पराभवामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 9:17 PM

Open in App

ICC One Day WorldCup 2023: रविवार(19 नोव्हेंबर 2023) हा दिवस कोणताच भारतीय विसरणार नाही. रविवारी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे संघातील प्रत्येक सदस्य निराश झाला आहे. या पराभवानंतर भारताचा सलामीवीर शुबमन गिलही खूप दुखात आहे. पण, आता त्याने विश्वचषक जिंकण्याची शपथ घेतली आहे. 

शुबमन गिलचा हा पहिला एकदिवसीय विश्वचषक होता. गिलने या स्पर्धेत आपल्या फलंदाजीने प्रभावित केले. मात्र, अंतिम सामन्यात त्याची बॅट चालली नाही. विजेतेपदाच्या लढतीत गिल अवघ्या चार धावांव र बाद झाला. 

अंतिम सामन्यातील पराभवानंतर गिलच्या आत एक आग धगधगत आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली असून या पोस्टमध्ये त्याने वर्ल्ड कप जिंकेपर्यंत हार मानणार नसल्याचे म्हटले आहे. गिलने लिहिले की, 16 तास झाले तरीही कालचा पराभव खूप त्रास देतोय. माझ्या प्रवासातील हा एक मैलाचा दगड होता. त्याने टीम इंडियाच्या चाहत्यांचे समर्थन केल्याबद्दल आभार मानले. तसेच, हा शेवट नाही, जोपर्यंत विश्वचषक जिंकत नाही, तोपर्यंत हे संपणार नाही, असेही म्हटले आहे.

गिलची वर्ल्डकपमधील कामगिरीपहिला एकदिवसीय विश्वचषक खेळणारा गिल डेंग्यूमुळे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. यानंतर त्याने या स्पर्धेत एकूण नऊ सामने खेळले, ज्यात त्याने 44.25 च्या सरासरीने 354 धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून चार अर्धशतके आलीली. गिल उपांत्य फेरीच्या सामन्यात शतक झळकावण्याच्या जवळ आला होता, पण नंतर त्याला क्रँप आल्याने मैदान सोडावे लागले. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपशुभमन गिलरोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ