दुबई : भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आयसीसी वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानी दाखल झाला आहे. अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कारकिर्दीत तिसºयांदा द्विशतकी खेळी करणा-या रोहितने क्रमवारीत दोन स्थानाने प्रगती केली आहे.
मालिकेत न खेळणारा भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली ८७६ मानांकन गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा ए.बी. डिव्हिलियर्स ८७२ मानांकन गुणांसह दुसºया स्थानी आहे.
मालिकेत सहा बळी घेणारा भारताचा लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने २३ स्थानांची प्रगती करताना गोलंदाजांच्या मानांकनामध्ये २८ वे स्थान पटकावले आहे. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने १६ स्थानांची प्रगती करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम ५६ वे स्थान पटकावले आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या १० स्थानांची उडी घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम ४५ व्या स्थानी दाखल झाला आहे.
श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज उपुल थरंगाने १५ स्थानांची प्रगती केली असून तो ३६ व्या स्थानी आहे. त्याचे ५७१ मानांकन गुण आहेत. निरोशन डिकवेलाने सात स्थानांची सुधारणा करीत ३७ वे स्थान पटकावले आहे. सुरंगा लकमलने १४ स्थानांची उडी घेत गोलंदाजांच्या मानांकनामध्ये २२ वे तर अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजने ९ स्थानांची प्रगती करीत ४५ वे स्थान पटकावले आहे.
संघाच्या मानांकनामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. भारतीय संघ ११९ मानांकन गुणांसह दुसºया स्थानी कायम आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत ३-० ने विजय मिळवला असता तर भारताला दक्षिण आफ्रिकेच्या (१२१ मानांकन गुण) स्थानी अव्वल स्थान पटकावता आले असते. (वृत्तसंस्था)
रोहितने प्रथमच फलंदाजांमध्ये ८०० मानांकन गुणांचा पल्ला ओलांडला. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेत २-१ ने विजय मिळवला. मालिकेनंतर रोहितच्या नावावर ८१६ मानांकन गुणांची
नोंद आहे.
रोहितने यापूर्वी फेब्रुवारी २०१६ मध्ये मानांकनात तिसरे स्थान पटकावले होते. रोहितच्या साथीने भारतीय डावाची सुरुवात करणारा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी शिखर धवनने एका स्थानाची प्रगती करताना १४ वे स्थान पटकावले आहे.
धवनने विशाखापट्टणममध्ये अखेरच्या वन-डेमध्ये नाबाद १०० धावांची खेळी करताना मालिकेत एकूण १६८ धावा फटकावल्या. त्याने दुसºया लढतीत ६८ धावांची खेळी करण्याव्यतिरिक्त रोहितसह ११५ धावांची भागीदारी केली होती.
Web Title: ICC Rankings: Rohit Sharma retains fifth place, Virat is ranked first
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.