IPL Auction 2021 : इंग्लंडच्या फलंदाजाला गर्लफ्रेंडनं केलं ट्रोल; लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर विचारला खोचक प्रश्न

ICC, IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) लिलावातील पहिल्या टप्प्यात इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज सॅम बिलिंग ( Sam Billings) हा अनसोल्ड राहिला.

By स्वदेश घाणेकर | Published: February 19, 2021 12:40 PM2021-02-19T12:40:36+5:302021-02-19T12:55:32+5:30

whatsapp join usJoin us
ICC reacts after Sam Billings reveals how his girlfriend trolled him after he went unsold in the IPL 2021 auction | IPL Auction 2021 : इंग्लंडच्या फलंदाजाला गर्लफ्रेंडनं केलं ट्रोल; लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर विचारला खोचक प्रश्न

IPL Auction 2021 : इंग्लंडच्या फलंदाजाला गर्लफ्रेंडनं केलं ट्रोल; लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर विचारला खोचक प्रश्न

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) लिलावातील पहिल्या टप्प्यात इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज सॅम बिलिंग ( Sam Billings) हा अनसोल्ड राहिला. पण, परतीच्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघानं त्याला २ कोटींच्या मुळ किंमतीत आपल्या ताफ्यात घेतले. केंट आणि इंग्लंडच्या ट्वेंटी-20 क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज म्हणून बिलींगची ओळख आहे आणि पहिल्या टप्प्यात अनसोल्ड राहिल्यानं त्याच्या गर्लफ्रेंडनेच त्याला ट्रोल केलं आणि त्यात ICCनंही हात धुवून घेतले. IPL Auction 2021 : तुझा अभिमान वाटतो भावा; अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, सारानं लिहिली पोस्ट...


ऑक्शनमध्ये जेव्हा त्याचं नाव घेतलं गेलं, तेव्हा कोणत्याच फ्रँचायझींनी त्याच्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. तो अनसोल्ड राहिला. त्याचवेळी बिलिगनं एक मजेशीर किस्सा ट्विट केला. त्यानं लिहिलं की,''माझी गर्लफ्रेंड साराहनं मला आताच विचारलं, तू गोलंदाज का झाला नाहीस?'' आयसीसीनंही त्याचं हे ट्विट रिट्विट करताना त्याची गोलंदाजीतील कामगिरी पोस्ट केली.   फ्रँचायझींनी फिरवली पाठ अन् पुढच्याच दिवशी ११ चेंडूंत ५६ धावा चोपून काढला राग


बिग बॅश लिगच्या २०२०-२१ पर्वात बिलिंगनं सिडनी थंडर्सचे प्रतिनिधित्व केलं आणि चांगली कामगिरीही केली. पण, आयपीएल फ्रँचायझींनी त्याच्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. दरम्यान, या लिलावात ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सनं सर्वाधिक १६.२५ कोटी मोजले, ऑस्ट्रेलियचा गोलंदाज झाय रिचर्डसन याला १४ कोटी मिळाले. अॅलेक्स केरी व ग्लेन फिलीप हे यष्टिरक्षक अनसोल्ड राहिले. अर्जुन तेंडुलकरच्या कौशल्याचं आकाश अंबानीकडून कौतुक; झहीर म्हणतो, तो मेहनती मुलगा!


दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) रिटेन खेळाडू : शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, अवेश खान, प्रवीण दुबे, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्तजे, मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, क्रिस वोक्स, डॅनियल सॅम्स; लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) २.२ कोटी, उमेश यादव (Umesh Yadav) १ कोटी, रिपाल पटेल ( Ripal Patel) २० लाख, विष्णू विनोद ( Vishnu Vinod) २० लाख, लुकमन मेरिवाला ( Lukman Meriwala) २० लाख, एम सिद्धार्थ ( M Siddharth) २० लाख, टॉम कुरन ( Tom Curran) ५.२५ कोटी, सॅम बिलिंग (Sam Billings) २ कोटी.

Web Title: ICC reacts after Sam Billings reveals how his girlfriend trolled him after he went unsold in the IPL 2021 auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.