‘आयसीसी’ने नियमात सातत्य राखावे : कोहली

निलंबनाच्या कारवाईमुळे श्रीलंकेविरुद्ध तिसºया कसोटी सामन्यात अव्वल फिरकीपटू रवींद्र जडेजाविना खेळावे लागणार असल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) खेळाडूंच्या आचारसंहितेबाबतचे नियम लागू करताना सातत्य असावे, असे आवाहन केले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:15 AM2017-08-12T01:15:16+5:302017-08-12T01:15:48+5:30

whatsapp join usJoin us
 ICC should continue to keep rules: Kohli | ‘आयसीसी’ने नियमात सातत्य राखावे : कोहली

‘आयसीसी’ने नियमात सातत्य राखावे : कोहली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कँडी : निलंबनाच्या कारवाईमुळे श्रीलंकेविरुद्ध तिसºया कसोटी सामन्यात अव्वल फिरकीपटू रवींद्र जडेजाविना खेळावे लागणार असल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) खेळाडूंच्या आचारसंहितेबाबतचे नियम लागू करताना सातत्य असावे, असे आवाहन केले आहे.
श्रीलंकेविरुद्ध शनिवारपासून प्रारंभ होत असलेल्या तिसºया व अखेरच्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना कोहली म्हणाला, ‘खेळाडूंनी सावध होणे आवश्यक आहे. भविष्यात सर्वांसाठी समान दिशानिर्देश राहील, अशी आशा आहे. कारण, परिस्थितीनुसार त्यात बदल व्हायला नको.’
कोहली पुढे म्हणाला, ‘यात सातत्य राहिले तर भविष्यात वाटचाल करण्यासाठी चांगले राहील. कारण खेळाडूंना मैदानावर कसे वर्तन असावे, याची कल्पना राहील. त्यामुळे चांगला खेळ होण्यास मदत मिळेल.’
जागतिक क्रमवारीत अव्वल कसोटी गोलंदाज व अष्टपैलू असलेल्या जडेजाच्या खात्यावर गेल्या २४ महिन्यांमध्ये सहा नकारात्मक गुणांची नोंद आहे. त्यामुळे त्याला एका कसोटी सामन्यातून निलंबित करण्यात आले. त्याच्याविरुद्ध खेळपट्टीवर धावणे आणि प्रतिस्पर्धी खेळाडूच्या दिशेने धोकादायक पद्धतीने चेंडू फेकणे हे गुन्हे आहेत. त्यामुळे शनिवारपासून प्रारंभ होणाºया कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही.
निलंबनाच्या कारवाईबाबत बोलताना कोहली म्हणाला, ‘खेळाडूंनी आयसीसीचे नियम समजून घेणे आवश्यक आहे; पण आयसीसीने अशा प्रकारचे महत्त्वाचे निर्णय घेताना सातत्य राखायला हवे. नियम अधिक स्पष्ट असतील तर खेळाडू त्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेतील.’
दरम्यान, विजयी आघाडी घेतल्यामुळे मालिकेची औपचारिकता पूर्ण करणाºया लढतीसाठी संघात मोठे फेरबदल करण्याची शक्यता कोहलीने फेटाळून लावली. भारताने गाले व कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत सहज विजय मिळविला. आता भारताला विदेशात ३-० ने विजय मिळविण्याची चांगली संधी प्राप्त झाली आहे.
कोहली पुढे म्हणाला, ‘ज्यांना खेळण्याची संधी मिळत नाही त्यांना संयम राखण्याचा सल्ला देण्यासाठी कौशल्य लागते. हे सोपे नसते. कारण सर्वंच खेळाडू खेळण्यास उत्सुक असतात. नशिबाने संधीची प्रतीक्षा करणारे खेळाडू आमच्याकडे आहेत. बाहेर बसून खूश असलेले खेळाडू आमच्याकडे आहेत. केवळ ११ खेळाडू खेळू शकतात, याची सर्वांना कल्पना आहे.’ कोहलीने शनिवारच्या लढतीसाठी असलेली खेळपट्टी अद्याप बघितलेली नाही; पण ही चिंतेची बाब नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
जडेजावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे; पण शनिवारी अंतिम ११ खेळाडूंमध्ये जडेजाच्या स्थानी कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे.

‘कुलदीपचा आपल्या क्षमतेवर विश्वास आहे. तो फलंदाजांना बुचकाळ्यात टाकण्यास उत्सुक असतो. हा त्याच्यातील महत्त्वाचा गुण आहे. त्याने धरमशाला कसोटीमध्ये ते सिद्ध केले आहे. ती खेळपट्टी फिरकीला अनुकूल नव्हती. पहिले दोन-तीन दिवस खेळपट्टी पाटा होता. चायनामॅन गोलंदाज संघात एक्स-फॅक्टरप्रमाणे असतो. शनिवारी त्याला चांगली संधी असून माझ्या त्याला शुभेच्छा आहेत.
- विराट कोहली, कर्णधार, भारत

श्रीलंकेत वन-डे मालिका खेळण्यास कुठली अडचण नाही : विराट कोहली

श्रीलंकेविरुद्ध आगामी वन-डे सामन्यांच्या मालिकेत खेळण्यास मला कुठली अडचण नाही, असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी स्पष्ट केले. व्यस्त कार्यक्रमाचा विचार करता त्याला विश्रांती देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

संघाच्या निवडीबाबत बोलताना कोहली म्हणाला, ‘मी खेळणार नाही, हे कुणी सांगितले. हे वृत्त कुणी पसरविले याची मला कल्पना नाही; पण मला खेळण्यात कुठली अडचण नाही.’

भारतीय संघाची निवड १३ आॅगस्टला होणार आहे. सीनिअर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.

कोहली म्हणाला, ‘निवड समिती व संघ व्यवस्थापनची निवडीबाबत लवकरच बैठक होणार आहे. त्यांच्या डोक्यात काही योजना असतील, त्यावर चर्चा होईल. कर्णधार या नात्याने समितीसोबत कुठल्या विषयावर बोलायचे आहे, याची मला कल्पना आहे.’

कोहली म्हणाला, ‘चांगला खेळ केल्यानंतर खेळाडू नियमितपणे खेळत आहेत. अपवाद केवळ आमचे नियंत्रण नसलेल्या स्थितीचा देता येईल.’

Web Title:  ICC should continue to keep rules: Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.