Join us  

Match Fixing: मॅच फिक्सिंगमुळे आणखी एक क्रिकेटपटू अडचणीत, ICC ने 14 वर्षांची घातली बंदी!

क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचा मुद्दा चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:39 PM

Open in App

मेलबर्न : क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचे प्रकरण नवे नाही. याच मॅच फिक्सिंगच्या मुद्द्यामुळे काही खेळाडूंची क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आली तर काहींवर काही काळासाठी बंदी घालण्यात आली. आता पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचा मुद्दा चर्चेत आला असून याची आयसीसीने दखल घेतली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये  (UAE) देशांतर्गत सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूला एप्रिल 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय मालिकेत मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी आरोपी घोषित करण्यात आले आहे. या संबंधित त्याच्यावर सात आरोप करण्यात आले आहेत. तसेच त्याच वर्षी कॅनडात झालेल्या टी-20 फ्रँचायझी स्पर्धेत दोषी आढळल्यानंतर 14 वर्षांसाठी सर्व क्रिकेट स्पर्धांमधून त्याला निलंबित करण्यात आले आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी एक निवेदन जारी करून आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायाधिकरणात झालेल्या सुनावणीनंतर मेहरदीप छावकर या खेळाडूवर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी अमिरातच्या राष्ट्रीय संघाच्या दोन खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे मेहरदीप छावकरवरची बंदी चर्चेचा विषय बनली आहे.

ICC ने 14 वर्षांची घातली बंदीयापूर्वी बंदी घालण्यात आलेल्या 2 खेळाडूंनी छावकर याच्याशी संबंधित ऑफरबाबत लाचलुचपत प्रतिबंधक संहितेचे उल्लंघन केल्याचे मान्य केले होते. खरं तर मेहरदीप छावकर हा यष्टीरक्षक फलंदाज आहे, जो UAE मधील अव्वल लीगमध्ये खेळला आहे. 2012 मध्ये अंडर-19 आशियाई क्लब स्पर्धेत देखील त्याने भाग घेतला होता. मात्र निलंबनाची कारवाई झाल्यानंतर क्रिकेटपटू छावकरने त्याच्यावरचे सर्व आरोप फेटाळले आहेत. परंतु आयसीसीने ठोठावलेल्या शिक्षेमुळे त्याला 14 वर्षे क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. 

 

 

टॅग्स :आयसीसीमॅच फिक्सिंगआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App