Babar Azam, ICC T20 Rankings: पाकिस्तानच्या बाबर आजमने मोडला सर्वात मोठा विक्रम; विराट कोहलीची मक्तेदारी संपुष्टात

ICC T20 Rankings: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्यासाठी विक्रम मोडणे हा सवयीचा भाग झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 03:33 PM2022-06-29T15:33:02+5:302022-06-29T15:33:50+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 Rankings: Pakistan captain Babar Azam being the top ranked T20I batter in the world for the longest period of time, break virat Kohli record | Babar Azam, ICC T20 Rankings: पाकिस्तानच्या बाबर आजमने मोडला सर्वात मोठा विक्रम; विराट कोहलीची मक्तेदारी संपुष्टात

Babar Azam, ICC T20 Rankings: पाकिस्तानच्या बाबर आजमने मोडला सर्वात मोठा विक्रम; विराट कोहलीची मक्तेदारी संपुष्टात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 Rankings: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्यासाठी विक्रम मोडणे हा सवयीचा भाग झाला आहे. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या  ट्वेंटी-20 क्रमवारीत  बाबरने अव्वल स्थान पटकावताना मोठा विक्रम मोडला. बाबरचा प्रत्येक नवा विक्रम हा टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्या मक्तेदारीला आव्हान देणारा ठरला आहे. आयसीसीच्या ट्वेंटी-20 क्रमवारी जाहीर झाल्यानंतर बाबरने विराटचा आणखी एक विक्रम मोडला. आयसीसी ट्वेंटी-20 फलंदाजांमध्ये सर्वाधिक दिवस अव्वल स्थानावर राहण्याचा मान आता बाबरने पटकावला आहे. तो 1014 दिवस या क्रमांकावर कायम राहिला आहे आणि विराटचा 1013 दिवसांचा विक्रम मोडला गेला आहे. 

बाबर 818 गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि पाकिस्तानचाच मोहम्मद रिझवान 24 गुणांच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिझवानच्या खात्यात 794 गुण आहेत. अव्वल 10 फलंदाजांमध्ये इशान किशन ( 682) हा एकमेव भारतीय 7व्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम ( 757), इंग्लंडचा डेवीड मलान ( 728), ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच ( 716) व न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे ( 703) हे 3 ते 6 व्या क्रमांकावर आहेत. श्रीलंकेचा पथूम निसंका 8व्या, न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील 9 वा आणि आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डेर ड्युसेन 10व्या क्रमांकावर आहेत.

बाबर केवळ ट्वेंटी-20 क्रिकेटमध्येच नव्हे, तर वन डेतही अव्वल आहे. वन डे क्रिकेटमध्ये सलग चार शतकं दोन वेळा करणारा तो पहिला फलंदाज आहे. कसोटीतही अव्वल स्थानावर झेप घेण्याची बाबरची तयारी आहे आणि सध्या तो 815 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.  


भारताविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत दमदार खेळी करणाऱ्या आयर्लंडच्या हॅरी टेक्टरने 66 वरून 55 व्या क्रमांकावर झेप घेतली. दीपक हुडानेही 414 स्थानांची झेप घेत 104 स्थान पटकावले आहे. कसोटीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट अव्वल स्थानावरील पकड मजबूत करून आहे. जॉनी बेअरस्टो 21व्या स्थानावर आला आहे.  
 

Web Title: ICC T20 Rankings: Pakistan captain Babar Azam being the top ranked T20I batter in the world for the longest period of time, break virat Kohli record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.