जगातिल सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा ऑलिम्पिकही एक वर्षानं पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. टोक्योत आता 2021मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळवण्यात येणार आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवरही अनिश्चिततेचं सावट आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 2022पर्यंत पुढे ढकलण्याचा विचार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) करत आहे.
2021मधील क्रिकेटचे व्यग्र वेळापत्रक लक्षात घेता यंदा होणारा पुरुषांचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2022मध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे. या वर्षी डिसेंबर महिन्यात भारतीय संघ दौऱ्यावर असणार आहे आणि त्यानंतर बिग बॅश लीग होणार आहे. त्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये इंडियन प्रीमिअर लीग असते. शिवाय 2021मध्ये भारतात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्यामुळे यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारी वर्ल्ड कप स्पर्धा 2022मध्ये खेळवली जाईल.
टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार,''ही स्पर्धा पुढे ढकलण्याची अंतर्गत चर्चा झाली, परंतु ती कधी होईल याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही.'' भारतीय संघ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर 2021च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग होणार आहे. मार्चमध्ये आयपीएल होणार आहे.
दरम्यान , कोरोना व्हायरसमुळे 2020 मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 2021मध्ये ही स्पर्धा कधी होईल, याबाबतची घोषणा सोमवारी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ( आयओसी), आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती ( आयपीसी), टोक्यो आयोजन समिती आणि टोक्यो सरकारची बैठक झाली. त्यात ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय झाला, तर पॅरालिम्पिक 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021 या कालावधीत होईल.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
१ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच
Corona Virus : क्रीडापटूंचा पुढाकार; जाणून घ्या कोणी केलं किती दान!
डेव्हिड वॉर्नरचा 'वैदिक' पाठिंबा, विराट कोहलीला दिलं चॅलेंज
रोहित शर्माचं मोठं दान; हिटमॅननं मारला मदतीचा कौतुकास्पद चौकार
महाराष्ट्राच्या मल्लानं जपली सामाजिक जाण; राहुल आवारेनं केलं 'लाख'मोलाचं दान
सानिया मिर्झानं गरजूंसाठी जमा केले कोट्यवधी; मिताली राजचाही मदतीचा हात