Join us

ICC T20 World Cup 2021, AFG vs NZ, Live: अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, किवी सज्ज; भारतीय चाहत्यांचंही लक्ष 

ICC T20 World Cup 2021, AFG vs NZ, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात लढत होत आहे. सामन्याची नाणेफेक अफगाणिस्ताननं जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 15:11 IST

Open in App

ICC T20 World Cup 2021, AFG vs NZ, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात लढत होत आहे. सामन्याची नाणेफेक अफगाणिस्ताननं जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सामना न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात होत असला तरी भारतीय चाहत्यांचं या सामन्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण आजच्या सामन्यातील निकालावर भारताचं उपांत्य फेरीतील भविष्य ठरणार आहे. आज न्यूझीलंडनं अफगाणिस्तानला पराभूत केलं तर किवी ८ गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि भारताचं आव्हान संपुष्टात येईल. पण अफगाणिस्ताननं आजचा सामना जिंकला तर भारताकडे नामिबियाविरुद्धची लढत चांगल्या फरकानं जिंकून उपांत्य फेरीत धडक मारण्याची संधी असणार आहे. 

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी अफगाणिस्तानच्या त्या गोलंदाजाचा उल्लेख केला आहे जो आज होणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यात निर्णायक भूमिका बजावू शकतो. हा गोलंदाज आहे मुजीब उर रहमान. गेल्या दोन सामन्यात त्याची उणीव अफगाणिस्तानला प्रकर्षाने जाणवली होती. त्यामुळेच आजच्या सामन्यात त्याचा संघात समावेश करण्याचा सल्ला गावस्कर यांनी दिला आहे.

सुनील गावस्कर म्हणाले की, मुजीब न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानसाठी ट्रंपकार्ड ठरू शकतो. कारण वरुण चक्रवर्तीप्रमाणेच त्याची गोलंदाजी खेळणे कठीण आहे. तसेच मुजीबकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे रशिद खानसोबत मिळून किवी फलंदाजांना त्रस्त करू शकतो.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१अफगाणिस्तानन्यूझीलंड
Open in App