Join us  

ICC T20 World Cup 2021, AFG vs NZ, Live: जादरान एकटाच भिडला! अफगाणिस्तानचं न्यूझीलंडसमोर विजयासाठी १२५ धावांचं आव्हान

ICC T20 World Cup 2021, AFG vs NZ, Live Updates: अफगाणिस्ताननं न्यूझीलंडसमोर विजयासाठी १२५ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 5:12 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021, AFG vs NZ, Live Updates: अफगाणिस्ताननंन्यूझीलंडसमोर विजयासाठी १२५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. किवी गोलंदाजी पुढे अफगाणिस्तानचे फलंदाज एकामागोमाग एक नांगी टाकत असताना नजीबुल्लाह जादरान यानं मैदानात जम बसवत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली आहे. नजीबुल्लाह जादरान यानं ४८ चेंडूत ७३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. यात ३ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. जादरान वगळता अफगाणिस्तानकडून इतर कोणताही फलंदाज विशेष कामगिरी करू शकला नाही. 

सामन्याची नाणेफेक जिंकून अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी या वेगवान अस्त्रांनी अफगाणी फलंदाजीला वेसण घातली. सलामीवीर हजरतुल्लाह जजाई (२) आणि मोहम्मद शेहजाद (४) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर गुरबाज (६), गुलबदीन नायब (१५) देखील काही खास कामगिरी दाखवू शकले नाहीत. त्यामुळे सामन्याच्या १० व्या षटकातच अफगाणिस्तानची ४ बाद ५६ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली होती. त्यानंतर नजीबुल्लाह जादरान यानं न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. जादरानच्या ७३ धावांच्या योगदानामुळे संघाला १०० धावांची वेस ओलांडता आली. कर्णधार मोहम्मद नबी यानं १४ धावा केल्या. २० षटकांच्या अखेरीस अफगाणिस्तानला ८ बाद १२४ धावा करता आल्या आहेत. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टनं सर्वाधिक ३ बळी घेतले. टीम साऊदीनं दोन जणांना बाद केलं. तर अॅडम मिल्ने, जिमी निशम आणि इश सोदी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१अफगाणिस्तानन्यूझीलंड
Open in App